शंभू ऑइल मिल या लाकडी घाण्यापासून तेल तयार करण्याच्या कारखान्याचे आ. पवारांच्या हस्ते उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

शंभू ऑइल मिल या लाकडी घाण्यापासून तेल तयार करण्याच्या कारखान्याचे आ. पवारांच्या हस्ते उद्घाटन

 शंभू ऑइल मिल या लाकडी घाण्यापासून तेल तयार करण्याच्या कारखान्याचे आ. पवारांच्या हस्ते उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जतकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तनपुरे परिवाराने टाकलेले शुद्ध तेलाचा उद्योग नक्कीच लाभदायक ठरेल असे गौरवोद्गगार आ रोहित पवार यांनी काढले. शंभू ऑइल मिल  या लाकडी घान्या पासुन तेल तयार करण्याच्या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कर्जत शहरापासून एक किलोमीटर अंतरावरती असलेल्या तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत येथे या शंभु ऑईल मिलची उभारणी पूर्ण झाली याचे उद्घाटन  आ रोहित पवार यांच्या हस्ते सम्पन्न झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत आदींसह नगरसेवक सचिन घुले, तानाजी पाटील, ओंकार तोटे, राम ढेरे, पप्पू तोरडमल, सुरेश तोरडमल, कालिदास शिंदे, अमृत काळदाते, रामदास हजारे, तात्या ढेरे, बंटी यादव, आदींसह अनेक जण उपस्थित होते यावेळी आमदार रोहित पवार यांनी तनपुरे कुटुंबियाचे कौतुक करताना शुद्ध तेलासह आहारातील  इतर अनेक बाबी कडे ही सर्वानी लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले. यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी बोलताना अशा व्यवसायाची समाजाला गरज असून स्टार्टअप च्या जमान्यात स्वतःचे वेगळे पण निर्माण करावे लागते असे म्हटले.
शंभु ऑईल मिलमुळे कर्जत शहरात प्रथमच शुद्ध लाकडी घाण्याचे  तेल मिळणार असून तनपुरे कुटुंबीयांनी हे चालू केले आहे यावेळी सोशल डिस्टन्स ठेवत छोटा कार्यक्रम आटोपन्यात आल्याचे सौ. ज्योती किशोर तनपुरेयांनी आवर्जून सांगितले.

No comments:

Post a Comment