सन्मिता शिंदे यांची ‘सूर नवा ध्यास नवा’साठी निवड
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या सुर नवा ध्यास नवा या गायन स्पर्धेत महाराष्ट्रातून हजारो स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.या स्पर्धेत वाहिनीसाठी हजारो स्पर्धकांमधून केवळ 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली.त्यामध्ये सौ.सन्मिता शिंदे यांची निवड झाली. या स्पर्धेत पारगाव - भातोडी,अहमदनगर येथील सौ.सन्मिता शिंदे यांनी आपला सहभाग नोंदवला.सौ.शिंदे यांनी संगीत विषयात पदवी संपादन केलेली असून गझल, भावगीत, भक्तीगीते ही त्यांची जमेची बाजू आहे. सन्मिता यांनी गायलेल्या सखी ग मुरली मोहन या गीताचे गायक महेश काळे व स्वप्नील बांदोडकर यांनी विशेष कौतुक करत त्यांची या स्पर्धेसाठी निवड केली. सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या पत्नी आहेत.
No comments:
Post a Comment