कोरोनाचा नायनाट होऊन सर्व मानवजात सुखी होऊ द्या गुरुवर्य भास्करगिरी बाबांची भगवान दत्तात्रयांकडे प्रार्थना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

कोरोनाचा नायनाट होऊन सर्व मानवजात सुखी होऊ द्या गुरुवर्य भास्करगिरी बाबांची भगवान दत्तात्रयांकडे प्रार्थना

 कोरोनाचा नायनाट होऊन सर्व मानवजात सुखी होऊ द्या गुरुवर्य भास्करगिरी बाबांची भगवान दत्तात्रयांकडे  प्रार्थना

श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयाची सांगता


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयाची गुरुवारी साध्या पद्धतीने मोजक्याच सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचे कार्य भक्तांच्या उद्धारासाठी व जगाच्या कल्याणासाठी होते असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.कोरोनाचा नायनाट होऊन सर्व मानव जात सुखी होऊ दया अशी प्रार्थना ही त्यांनी भगवान दत्तात्रयांना केली.
श्री दत्त मंदिराच्या मुख्य सभामंडपात गुरुवारी दि.8 एप्रिल रोजी छोटेखानी पद्धतीने पार पडलेल्या सांगता कार्यक्रम प्रसंगी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी भक्तांच्या उद्धारासाठी व समाजांच्या कल्याणासाठी कार्य केले समाज सुखकरिता त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवला गावोगावी भंडारे घालून समाजात ऐक्य निर्माण केले.  देवगड क्षेत्री गुरुदेव दत्त पीठ निर्माण केले.त्यांनी दिलेली शिकवण व भक्तिमार्ग अंगिकार करण्याचा व संत जीवनाचा मागोवा घेत जीवनात वाटचाल करण्याचा प्रयत्न करा,प्रेम युक्त अंतःकरणाने भंगवंताची सेवा करून जीवनाला धन्य बनवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.आज संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असून कोरोनाच्या संकटातून मानवजातीला मुक्त करा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी बोलताना केली.
माणसाने जीवनाच्या गाडीचे गेर देखील बदलत्या काळानुसार बदलण्याचा प्रयत्न करावा,ईश्वराच्या चिंतनाने संकटाची गाडी नक्कीच दूर गेल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना केला.यावेळी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची आरती करण्यात आली.
पाच दिवस चाललेल्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयाची काला वाटप करून सांगता करण्यात आली.सद्या कोरोनामुळे देवगडचे दत्त मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने परिसरात शुकशुकाट दिसून येत होता.नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून जीवाला सुरक्षित करा,काळजी घ्या,सामाजिक अंतराचे पालन करा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यावेळी बोलताना केले.

No comments:

Post a Comment