कोरोनाचा नवा ट्रेण्ड घातक! तोडले आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 7, 2021

कोरोनाचा नवा ट्रेण्ड घातक! तोडले आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड.

 कोरोनाचा नवा ट्रेण्ड घातक! तोडले आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड.नगरी दवंडी

नगर : देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अतिशय धोकादायक वळणावर पोहचत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात तब्बल १ लाख १५ हजार ३१२ कोरोना संक्रमीत रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा देशभर होणारा हा फैलाव चिंतेत अधिक भर टाकणारा आहे.

आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जाहिर केलेली कोरोनाची आकडेवारी धोक्याची घंटा ठरतेय. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजारांच्या घरात नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. कोरोना संक्रमणकाळात ही दुसरी वेळ आहे जेव्हा कोरोना रुग्णांच्या एका दिवसाच्या संख्येनं एक लाखांचा टप्पा ओलांडलाय. याअगोदर सोमवारी ( ५ एप्रिलला) सकाळी जाहीर झालेली आकडेवारी पाहता, त्यात एका दिवसात १ लाख ३ हजार ५५८ कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र आज जाहीर झालेली संख्या ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या ठरलीय. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख १५ हजार ७८५ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशात आता कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ती ८,४३,४७३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ५९,८५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १,१७,९२,१३५ इतकी झाली आहे. तर, गेल्या २४ तासात कोरोनामुळे ६३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून वेगाने रुग्णवाढ होत आहे. आजचा आकडा विचारात घेतल्यास,गेल्या सात महिन्यांमध्ये आढळलेला हा सर्वात मोठा आकडा आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास गेल्या २४ तासात महाराष्ट्रात कोरोनाचे ५५ हजार ४६९ रुग्ण समोर आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here