हॉटेल चालकास लाखोंचा गंडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

हॉटेल चालकास लाखोंचा गंडा

 हॉटेल चालकास लाखोंचा गंडानगरी दवंडी

अहमदनगर - धान्य खरेदीत दाम दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखून एका हॉटेल चालक महिलेकडून लाखो रुपये घेऊन महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे .

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा या व्यापार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर परिसरात राहणार्‍या हॉटेल चालक महिला विजया भगवान पवार (वय 55 वर्ष) या महिलेस नवल रमणलाल बोरा (रा. वर्धमान हौसिंग सोसायटी, श्रीरामपूर) याने विश्वासात घेऊन तुम्ही माझ्यासोबत सोयाबीन व इतर धान्य खरेदी करण्यात माझ्यासोबत पैसे गुंतवले तर मी तुम्हाला दाम दुप्पट करून देईल,असे आमिष दाखविले.

आरोपीने विजया यांच्याकडून वेळोवेळी लाखो रक्कम आपल्या खात्यावर वर्ग करून घेतली. संबंधित रक्कम महिलेने पार्ट मागितली असता तिला पैसे देण्यास टाळाटाळ करून शिवीगाळ करून फसवणूक करून धमकी दिली.

याप्रकरणी विजया पवार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी नवल रमणलाल बोरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सादर व्यापाऱ्यांविरोधात यापूर्वीही फसवणुकीची प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल आहे.

No comments:

Post a Comment