कोरोना योद्धा पारनेरची संघर्ष कन्या पुन्हा मैदानात ! कु. राजेश्वरी कोठावळे यांचा कोरोना रुग्णांसाठी योगभ्यास व मार्गदर्शन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

कोरोना योद्धा पारनेरची संघर्ष कन्या पुन्हा मैदानात ! कु. राजेश्वरी कोठावळे यांचा कोरोना रुग्णांसाठी योगभ्यास व मार्गदर्शन

 कोरोना योद्धा पारनेरची संघर्ष कन्या पुन्हा मैदानात !

कु. राजेश्वरी कोठावळे यांचा कोरोना रुग्णांसाठी योगभ्यास व मार्गदर्शन 



नगरी दवंडी

पारनेर- पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. ही पारनेर तालुक्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.  कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोरठण खंडोबा पिंपळगाव रोठा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

 दरम्यान पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांना त्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. या ठिकाणी जवळपास 150 हून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. कोरठण पिंपळगाव रोठा येथे यावेळी योग प्रशिक्षक  आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. राजेश्वरी कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांना राज योग मेडिटेशन नुसार ध्यानधारणा व योगा करण्यात आला. यावेळी फुफ्फुसांचे कार्यक्षमता वाढवणारी प्राणायाम करून घेण्यात आले. 

 यावेळी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व  प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 पिंपळगाव रोठा येथील करोना कोविड सेंटर चांगल्या रीतीने सुरू आहे. तेथे योगा अभ्यासाचे  शिबिर घेण्यात आले यावेळी अनेक रुग्ण कोरोना च्या भीतीने वावरत असतात त्यांना या भीतीमध्ये न राहता शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने योगप्रशिक्षक राजेश्वरी कोठावळे यांनी योगअभ्यासाचे मार्गदर्शन केले. ज्या रुग्णांना ऑक्सिजनचा त्रास होतो. त्यांना पारनेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. मात्र ज्यांना कोणताही त्रास नाही त्यांनी त्यांची मानसिक स्थिती उत्तम रित्या टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी येथे प्रयत्न केले जात आहेत.

पारनेर तालुक्यात आत्तापर्यंत ५००० हुन अधिक कोरोना रुग्णांना मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी योग प्रशिक्षण देणाऱ्या राजेश्वरी कोठावळे या कोरठण येथे नव्याने सुरू झालेल्या कोरोना सेंटरमध्ये येऊन योग अभ्यास घेऊन रुग्णांना यावेळी आधार दिला. त्यामुळे पारनेरची संघर्ष कन्या कोरोना योद्धा राजेश्वरी कोठावळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांसाठी मैदानात उतरल्या आहेत.

No comments:

Post a Comment