जामखेड शहरातील चार कापड दुकाने 7 दिवसासाठी सील नगरपरिषदेचे कारवाई..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

जामखेड शहरातील चार कापड दुकाने 7 दिवसासाठी सील नगरपरिषदेचे कारवाई.....

 जामखेड शहरातील चार कापड दुकाने 7 दिवसासाठी सील नगरपरिषदेचे कारवाई..... नगरी दवंडी


जामखेड - जामखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील चार कापड दुकांनामधील कर्मचाऱ्यांची RTPCR  तपासणी केली असता कोरोना रुग्णांबाबत भयावह परिस्थिती दिसून आली आहे. शहरातील 

आशिर्वाद कलेक्शन ४, शांतीराज कलेक्शन ४, शितल कलेक्शन ५, एन महेश ३, या कापड दुकांनामधून  एकुण १६ पेशंट आढळून आले आहे

जामखेड शहरातील व्यावसायिक आस्थापनांमधील  मालक  व कर्मचारी यांची नगरपरिषदे प्रशासनाच्या वतीने RTPCR  तपासणी केली असून वरील  दुकांनामधील १६ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे या दुकांनामधील कर्मचारी super spreader असल्याने आजपासून 7 दिवसांसाठी ही दुकाने सील करण्यात आलेली आहेत.तसेच शहरातील सर्व शहरातील सर्व व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व दक्षता घेण्याच्या व शासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई ईशाराही देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment