आनंदऋषीजी हॉस्पिटलचा खुलासा, सरकारच्या परवानगीनेच कंपनीेचा स्टिकर बदलून संपूर्ण महाराष्ट्रात इंजेक्शन पुरवठा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

आनंदऋषीजी हॉस्पिटलचा खुलासा, सरकारच्या परवानगीनेच कंपनीेचा स्टिकर बदलून संपूर्ण महाराष्ट्रात इंजेक्शन पुरवठा

 आनंदऋषीजी हॉस्पिटलचा खुलासा, सरकारच्या परवानगीनेच कंपनीेचा स्टिकर बदलून संपूर्ण महाराष्ट्रात इंजेक्शन पुरवठा

कॅडीलाच्या रेमडेसीवीर इंजेक्शनबाबतची व्हिडिओ क्लिप हा खोडसाळपणा



नगरी दवंडी


नगर : जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मेडिकलमधून खरेदी केलेले रेमडेसीवीर इंजेक्शन एक्सपायर झालेले असताना ते रूग्णांना दिले जात आहे, अशा स्वरुपाची तक्रार करणारी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेली आहे. या क्लिपमुळे रूग्णांचा गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेवून आनंदऋषीजी हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने खुलासा करीत वस्तुस्थिती मांडली आहे. कॅडिला झायडस ही कंपनी जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी असून त्यांच्या इंजेक्शनचा पुरवठा संपूर्ण महाराष्ट्रात होतो. या कंपनीने आपल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचे दर कमी केल्यानंतर सरकारच्या परवानगीनेच नवीन एमआरपीचे स्टिकर लावले तसेच शासनानेच त्यांना एक्स्पायरी डेट सहा महिन्यांऐवजी 12 महिने करण्याची परवानगी दिली. त्यानुसार कंपनीने नवीन एमआरपी व नवीन एक्स्पायरी डेटचे स्टिकर लावलेला माल संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केला. असे नवीन स्टिकर लावलेली इंजेक्शने डिस्ट्रीब्युटर मार्फत आनंदऋषीजी हॉस्पिटलला मिळाली. तीच रूग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे फक्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्येच असे स्टिकर लावलेली इंजेक्शन विक्रीसाठी आहेत, असा कोणताही प्रकार नसून नगर तसेच राज्यातील इतरही हॉस्पिटलमध्ये अशीच इंजेक्शने विक्रीसाठी आहेत. ही सगळी वस्तुस्थिती असताना कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करीत आनंदऋषीजी हॉस्पिटलची बदनामी करण्याच्या हेतूने सदर व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हायरल केली आहे. हा प्रकार सर्वस्वी निषेधार्ह असून सेवाभावी वृत्तीने रूग्णसेवा करणार्‍या आनंदऋषीजी हॉस्पिटलला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा खुलासा हॉस्पिटलच्यावतीने विश्वस्त तसेच प्रशासनाने केला आहे.

केंद्र सरकारच्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियानेच 2 फेब्रुवारी 2021 च्या पत्रानुसार झायडस कॅडिला कंपनीला सदर इंजेक्शनची एक्स्पायरी डेट सहा महिन्यांऐवजी बारा महिने करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कंपनीने सरकारी परवानगीनेच आपल्या इंजेक्शनवर वाढीव एक्स्पायरी डेटचे तसेच कमी केलेल्या एमआरपीचे स्टिकर लावले आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलला या इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या डिस्ट्रीब्युटरनेही सदर इंजेक्शनचे कंपनीकडील खरेदी बिलही हॉस्पिटलला दिलेले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल सेवाभावी वृत्तीने व सामाजिक बांधिलकी जपून रूग्णसेवेचे कार्य करीत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशात हॉस्पिटलचा उत्त्कृष्ट सेवेसाठी लौकिक आहे. हॉस्पिटलकडून आतापर्यंत कधीही गैरप्रकार झालेले नाहीत व भविष्यातही अशा गोष्टींना कधीही थारा दिला जाणार नाही. त्यामुळे पूर्ण माहिती न घेता असे बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे असून अशा प्रवृत्तींवर प्रशासनाने कठोर कारवाई करायला हवी, अशी भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने मांडली आहे.

No comments:

Post a Comment