निंबळक मध्ये 14 तारखेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता लॉक डाऊन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, April 4, 2021

निंबळक मध्ये 14 तारखेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता लॉक डाऊन.

 निंबळक मध्ये 14 तारखेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता लॉक डाऊन.नगरी दवंडी

अहमदनगर- जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा वेगाने फैलाव होता आहे. दिवसाला हजारांच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत आहे.यामुळे नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. करोनाचा वाढता संसर्ग पाहता निंबळक येथील ग्राम सुरक्षा समितीने 14 तारखेपर्यत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. निंबळक (ता.नगर) भागात करोना रुग्णाची संख्या दिवसोदिवस वाढत आहेत.

गावाला लागून एमआयडीसी असल्याने कामावर जाणाच्या कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. बहुतेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहे. यामुळे करोना रुग्णाची संख्या वाढत आहे.यावर नियत्रंण आणण्यासाठी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक घेण्यात आली.

सकाळी 8 ते 12 वेळेत दुकाने उघडे राहतील आणि त्यानंतर दवाखाना, मेडीकल व दुध डेअरी फक्त उघडे राहतील.समिती गावावर लक्ष असणार विनाकारण फिरणारे, तसेच विना मास्क फिरणार्‍याला शंभर रूपये दंड करण्यात येणार आहे.

गावात ज्या भागात करोनाचे रुग्ण सापडले तो परीसर दहा दिवसासाठी बंद केला आहे. हे निर्णय गावच्या हितासाठी घेतले आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य लामखडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here