जिल्हयातील हे शहर राहणार 7 दिवस बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

जिल्हयातील हे शहर राहणार 7 दिवस बंद.

 जिल्हयातील हे शहर राहणार 7 दिवस बंद.नगरी दवंडी


अहमदनगर - राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

याची दखल घेत आज दिनांक ४ एप्रिल रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या उपस्थितीत प्रशासन व शहरातील व्यापाऱ्यांची बैठक होऊन शहरात ७ दिवसांचे लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय.

अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात कोरोना महामारीची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. जिल्ह्यात रोज हजारोंच्या संख्येने रूग्ण आढळून येत आहेत. राहुरी तालुक्यात काही दिवसांपासून रूग्ण संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे.

तालूक्यातील वाढती रूग्णसंख्या पाहता शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांची आज दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी राहुरी नगरपरिषदच्या सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती.

या बैठकीत राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शहरातील लाॅकडाऊन संदर्भात अनेकांनी आपली मते मांडली. सर्व बाबींचा विचार करून शहरात सात दिवसांचे लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सर्वानूमते घेण्यात आलाय.

गुरूवार दिनांक ८ एप्रिल ते बुधवार दिनांक १४ एप्रिल पर्यंत किराणा दुकान व पिठ गिरण्यासह पुर्ण बाजारपेठ बंद राहणार.अत्यावश्यक म्हणून फक्त दवाखाने व मेडिकल सुरू राहणार आहेत. असा निर्णय बैठकी दरम्यान घेण्यात आलाय.

लाॅकडाऊन दरम्यान गोर गरीब लोकांची अडचण होऊ नये. यासाठी शहरातील व्यापारी असोसिएशन व स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने गरजवंतांना अन्न धान्याचे वाटप करण्यात येईल. असे राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी सांगितले.

यावेळी प्रकाश पारख यांनी शहरातील सर्व व्यापार्‍यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, दिलीप चौधरी, नगरसेवक नंदुभाऊ तनपूरे, बाळासाहेब उंडे,

डाॅ. जयंत कुलकर्णी, आरपीआय चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालूकाध्यक्ष विलास साळवे, शहराध्यक्ष निलेश जगधने, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाश पारख, राजेंद्र सिन्नरकर,

अझीम कच्ची, तहसिलदार फसियोद्दीन शेख, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, तालूका वैद्यकीय अधिकारी दिपाली गायकवाड, पोलिस उप निरीक्षक गणेश शेळके, निरज बोकिल आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment