जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली - जेऊरचा आठवडे बाजार भरलाच.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली - जेऊरचा आठवडे बाजार भरलाच..

 जेऊरचा आठवडे बाजार भरलाच..

स्लग - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली  




नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असताना देखील आदेश झुगारत शनिवार दि. ३ रोजी जेऊर येथे मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरला होता.

     शनिवारी जेऊर येथील आठवडे बाजार असतो. जेऊर पंचक्रोशीतील इतर गावांनी बाजार भरत नसल्याने जेऊरचा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही आज जेऊर येथे बाजार भरुन मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

     जेऊरचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय २२फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला होता. परंतु त्या निर्णयाला काही सदस्यांनी तसेच व्यापा-यांनी विरोध केल्याने बाजार पुर्ववत भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

       जेऊरचा आठवडे बाजार गावातील सिना नदी पात्रात भरत असतो. बाजार बंदचा आदेश असल्याने बाजार सिना नदी पात्रात न भरता महावितरण कंपनीच्या चौकात भरला होता. बाजारात व्यापारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

      बाजार भरल्याची माहिती एम.आय.डी.सी. पोलीसांना समजल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश थोरवे व पोलीस नाईक दिपक गांगर्डे यांनी बाजार करुंना समज देत हटविले. परत गर्दी न करण्याची सक्त ताकीद दिली.


नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे

नगर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बाजार बंद असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांची अडचणी निर्माण होत असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गर्दी न करता आपला भाजीपाला विक्री करावा.

.....भिमराज मोकाटे ( सरपंच इमामपू

मास्कचा वापर अनिवार्य

ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी मास्क सॅनिटायझर व सामाजिक आंतर राखणे गरजेचे आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

.....डॉ. योगेश कर्डिले (प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर)

------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment