स्वयंसेवी संस्थांचा ‘कॅडल मार्च’! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

स्वयंसेवी संस्थांचा ‘कॅडल मार्च’!

 स्वयंसेवी संस्थांचा ‘कॅडल मार्च’!

3 दिवसात ‘रेमडेसिव्हिर’ उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना रुग्णांना उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. कोरोनामुळे रोजच मृत्यू वाढत आहेत. जिल्हाधिकारी रोज पत्रक काढून सर्व ‘अलबेल’ असल्याचे भासवत आहेत. पण बेड, रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनचा रोजच तुटवडा भासत आहे. माहिती कक्षाकडे बेड, रेमडेसिव्हिर चा ऑनलाइन डाटा उपलब्ध नाही या सर्व गंभीर बाबींची दखल घेवून शहरातील स्वयंसेवी संस्थांनी आक्रमक पवित्रा घेत काल सायंकाळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत कॅडल मार्च काढला. शहरात रुग्णांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनची मदत मिळत नाही, असा आरोप यावेळी उपस्थितांनी केला. हातात मेणबत्त्या व सोशल डिस्टन्स राखत हे समाजसेवक काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांचे आकडा वाढत असून रुग्णांना वेळेवर बेड व उपचार मिळत नाहीत. त्यामुळेच जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा वाढत आहे. यामुळे जिल्हाभरातून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याच नाराजीतून शहरातील स्वयंसेवी संघाने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॅडल मार्च काढून ठिय्या आंदोलन केले.
 यावेळी अ‍ॅड. आस्वा म्हणाले, “उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक सैरभैर फिरत आहेत. जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी केबिनमध्ये बसून फतव्या वर फतवे काढून कागद रंगून जिल्ह्यात सर्व उत्तम असल्याचे भासवत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. माहिती कक्षाकडे माहितीच नाही. बेड रेमडेसिव्हिर इंजेक्शन वरील ऑनलाइन डाटा दर तासाला अद्यायावत करा.”
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तीन दिवसात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होईल. त्यानंतर परिस्थिती सामान्य होईल, असे आश्वासन स्वयंसेवी महासंघास दिले. त्यावर कुलकर्णी यांनी तीन दिवसात परिस्थिती सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.या आंदोलनात स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, अनिल गावडे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अ‍ॅड श्याम आसावा, मिशन राहातचे अजित माने, स्वयमसेवी संस्था महासंघाचे अनिकेत कोर, हनिफ शेख, राजीव गुजर, अजित कुलकर्णी, मीना पाठक, दीपक पापडेजा आदी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here