बालकांसाठी नेहमीच सज्ज असणार्‍या चाईल्ड लाईनचा 18 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

बालकांसाठी नेहमीच सज्ज असणार्‍या चाईल्ड लाईनचा 18 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा!

 बालकांसाठी नेहमीच सज्ज असणार्‍या चाईल्ड लाईनचा 18 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा!

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचे सावट पसरलेले आहे,  हे आपणा सर्वांना माहितच आहे. ही बाब लक्षात घेऊन कोरोना नियम पाळुन चाईल्ड लाईनचा महत्वाचा 18 वा वर्धापनदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम दोन सञामध्ये पार पडला पहिल्या सत्रामध्ये चाईल्ड लाईन कार्याचे सादरीकरण व पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले आणि दुस-या सञामध्ये बालकांसोबत सुसंवाद साधण्यात आला.  या कार्यक्रमात विविध क्षेञात तज्ञ असेलेले प्रमुख पाहुणे, स्नेहालय संस्थेतील सर्व प्रकल्प समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावनेतुन झाली. मा.हनिफ शेख सरांनी चाईल्ड लाईनचा 18 वर्षाचा कार्यकाळ व कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्तावनेतुन मांडली. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आर्मी पब्लिक स्कूलचे शिक्षिका सौ. रेश्मा मॅडम, बाल कल्याण समितीचे सदस्य- सौ. बागेश्री जरेंडीकर, बाल कल्याण समितीचे सदस्य- प्रविण मुत्याल, स्नेहालय अध्यक्ष श्री. संजय गुगळे, स्नेहालय सचिव श्री. राजीव गुजर, अ‍ॅड.शाम आसावा सर, साई संघर्ष सामजिक प्रतिष्ठानचे श्री. योगेश पिंपळे तसेच स्नेहालय व चाईल्ड लाईनचे संपूर्ण स्वयंसेवक यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन चाईल्ड लाईनबद्दल आपापली मते व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी रेल्वे चाईल्ड लाईनसाठी प्रयत्न करण्याचे सुचविले. त्याचबरोबर जिल्ह्यातील  सर्व शाळेमध्ये शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत चाईल्ड लाईनची माहिती पसरावी. यासाठी  शाळांमध्ये चाईल्ड लाईन माहिती फलक लावण्याचे सुचविले चाईल्ड लाईनच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment