निघोज पतसंस्था एक आदर्श पतसंस्था - आ. निलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

निघोज पतसंस्था एक आदर्श पतसंस्था - आ. निलेश लंके

 निघोज पतसंस्था एक आदर्श पतसंस्था -  आ. निलेश लंके


निघोज ः
निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा लोणी मावळा येथील शाखेच्या नवीन जागेत स्थलांतराचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहर्तावर मा. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी निघोज नागरी पतसंस्थेचे कामकाज हे अहमदनगर जिल्ह्यात आदर्शवत आहे. अशा शब्दात निघोज पतसंस्थेचा गौरव आमदार लंके यांनी केला. पतसंस्थेने सभासद, खातेदार, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केला तसेच कोरोनाच्या या संकटसमयी पतसंस्थेने  चांगल्या प्रकारे परिसरात गोरगरीब जनतेला मदत व सहकार्य केले. त्याचप्रमाणे संस्थेने प्रथम क्रमांकाचे दिपस्तंभ , बॅको पुरस्कारा सारखे अनेक पुरस्कार मिळवुन  राज्यात निघोज पतसंस्थेने आपल्या पारनेर तालुक्याची सहकार क्षेत्रात ओळख निर्माण करून उत्तम कामगिरी करून एक आदर्श निर्माण केलेला असुन तालुक्याचे नाव राज्य पातळीवर नेलेले आहे . अशा शब्दात त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा श्री वसंत कवाद यांनी संस्थेच्या 13 शाखा असुन त्या कोअर बँकीग झालेल्या असुन संस्थेच्या 31 मार्च 2021 अखेर संस्थेच्या ठेवी 153 कोटी 20 लाख, कर्ज 97 कोटी 47 लाख, गुंतवणूक 88 कोटी 30 लाख, निधी 21 कोटी 54 लाख असुन  निव्वळ नफा  3 कोटी 25 लाख झालेला आहे. सर्व सभासद ठेवीदार खातेदार यांचा संचालक मंडळावर असणार्‍या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. असे अध्यक्षांनी सांगीतले. संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.दत्तात्रय लंके यांनी संस्थेच्या  सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदारांसाठी असणार्‍या विविध  योजनाची व सुविधाची माहीती त्यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निघोज गावचे माजी सरपंच श्री ठकाराम लंके होते.

No comments:

Post a Comment