15 ते 21 एप्रिलपर्यंत राहुरी शहरात टाळेबंदी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

15 ते 21 एप्रिलपर्यंत राहुरी शहरात टाळेबंदी

 15 ते 21 एप्रिलपर्यंत राहुरी शहरात टाळेबंदी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः शहरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयांत बेड मिळेनासे झाले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घेऊन 15 ते 21 एप्रिलदरम्यान राहुरी शहरात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय एकमताने घेतल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली .
शहरातील व्यापार्‍यांची नुकतीच बैठक झाली.पारख यांच्यासह सूर्यकांत भुजाडी ,विलास तरवडे, कांता तनपुरे ,संजीव उदावंत ,प्रवीण ठोकळे ,अनिल कासार,एकनाथ खेडेकर, योगेश चुत्तर , देवेंद्र लांबे ,प्रसाद कोरडे ,सचिन वने ,प्रवीण दरक आदी उपस्थित होते पारख म्हणाले , राहुरी शहरात व्यावसायिकांच्या वीस संघटना आहेत. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन वरील निर्णय एकमताने घेतला.
टाळेबंदीच्या काळात शहरातील दवाखाने , औषधांची दुकाने चोवीस तास सुरू राहतील . व्यापारी पेठेतील औषधांची दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक ,भाजीपालाविक्री सकाळी सात ते अकरा वाजेदरम्यान सुरू राहील .पतसंस्था , बँका त्यांच्या निर्धारित वेळेत सुरू राहतील . इतर सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले जातील .शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये ,असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here