घरी रहा... सुरक्षित रहा..हीच खरी डॉ.आंबेडकरांना आदरांजली ः सुखदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

घरी रहा... सुरक्षित रहा..हीच खरी डॉ.आंबेडकरांना आदरांजली ः सुखदान

घरी रहा... सुरक्षित रहा..हीच खरी डॉ.आंबेडकरांना आदरांजली ः सुखदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नेवाशात विविध संघटनांच्यावतीने अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.कोरोनाच्या या संकटात शासकीय नियमांचे पालन करा..घरी रहा... सुरक्षित रहा..हीच खरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल असे आवाहन बहुजन समाजाचे युवा नेते व घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुखदान यांनी जनतेला केले आहे.
नेवासा एस.टी.स्टँड समोरील चौकात झालेल्या छोटेखानी जयंतीच्या निमित्ताने घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुखदान,अहमदनगर जिल्हा अष्टेडू मर्दानी
आखाडा संघटनेचे सुरेश लव्हाटे,पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम गीते,भाजपचे नगरसेवक दिनेश व्यवहारे, अजित नरुला,सामाजिक कार्यकर्ते दाऊद बागवान,प्रेस क्लबचे मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे,अध्यक्ष रमेश शिंदे,संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण,रिक्षा संघटनेचे कचरू राजगिरे,उमेश इंगळे,अजय त्रिभुवन,सिद्धार्थ     सुखदान,पृथ्वी सुखदान यावेळी उपस्थित होते.
यावेळी संजय सुखदान यांनी घरात बसूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करा सामाजिक अंतराचे पालन करा हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले.
नेवासा येथील नामदार शंकरराव गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे युवा नेते अनिल ताके, सुनील धायजे,स्वीय सहायक सुनील जाधव,दिव्यांग संघटनेचे मार्गदर्शक अमित जेधे,अन्सार शेख,पिंटूभाऊ जिरे यांनी पुष्पांजली अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
नेवासा पंचायत समितीच्या दालनात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सभापती रावसाहेब कांगुणे व अँड.मनोज हारदे यांनी  पुष्पहार घालून अभिवादन केले.तर नगरपंचायत चौकात विराट सामाजिक प्रतिष्ठान व प्रदीप भाऊ सरोदे मित्र मंडळाच्या वतीने विल्यम गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतराचे पालन करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

No comments:

Post a Comment