प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते राहुरी नगरपालिकेत घंटागाड्यांचे लोकार्पण
नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी नगरपालिकेने 14 व्या वित्त आयोगातून स्वच्छता अभियानांतर्गत कचरा उचलण्यासाठी 54 लाख 85 हजार रुपये किंमतीच्या सात घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. त्या गाड्यांचे लोकार्पण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी राज्यमंत्री तनपुरे म्हणाले , की राज्य सरकारने 14 व्या वित्त आयोगातील काही निधी हा स्वच्छता अभियान व पर्यावरण विभागासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या व त्या निधीचा घंटागाड्या खरेदी साठी करण्याचा निर्णय राहुरी नगरपालिकेने घेतला . पालिकेने सात घंटागाड्या खरेदी केल्या आहेत . याचा वापर राहुरी शहर कचरामुक्त होऊन शहर स्वच्छ ठेवण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असून त्यास शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन केले . गेल्या वर्षांपासून नगरपालिकेच्या वतीने ’ माझी वसुंधरा ’ स्वच्छता अभियान राबवित आहे . शहरातील कचरा उचलण्यासाठी एक व ठेकेदाराकडे सहा गाड्या होत्या . त्यात आता या सात नवीन गाड्यांची भर पडली आहे . त्यामुळे राहुरी सुंदर शहर स्वच्छ शहर याकडे वाटचाल सुरु आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी पालिका प्रशासन व पदाधिकारी यांचा प्रयत्न असून त्यास शहरातील नागरिक , व्यापार्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्यमंत्री तनपुरे यांनी केले
यावेळी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी नंदकुमार तनपुरे , अनील कासार , प्रकाश भुजाडी , दशरथ पोपलघट दिलीप चौधरी , विलास तनपुरे , बाळासाहेब उंडे , अशोक आहेर , विजय करपे , संजय साळवे , मुख्याधिकारी डॉ . श्रीनिवास कुरे , आरोग्य विभागप्रमुख राजेंद्र पवार , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव , पांडुरंग उदावंत जीवन गुलदगड आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment