भारत गॅस कंपनीसाठी विनापरवाना झाडांची कत्तल करून खोदकाम? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

भारत गॅस कंपनीसाठी विनापरवाना झाडांची कत्तल करून खोदकाम?

 शेतकर्‍यांची कालिया प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

भारत गॅस कंपनीसाठी विनापरवाना झाडांची कत्तल करून खोदकाम?

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव, ढोरजा, कोथुळ येथील रस्त्यालगत असणार्‍या शेतजमीनीतुन कालिया प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीमार्फत भारत गॅस पाईपलाईनचे खोदकाम चालू असून ही कंपनी शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तसेच त्या जमिनीचा मोबदला न देता खोदकाम करत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेने असणार्या मोठाल्या झाडांची सर्रास तोड केली असून शेतकर्‍यांना त्यांची होणारी नुकसान भरपाई तात्काळ मिळावी तसेच झाडांची तोड केल्या प्रकरणी त्यांच्यावर वनविभाग मार्फत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून आणि नागरिकांमधून होत आहे.
   कालिया प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीमार्फत भारत गॅस पाईपलाईनच्या खोदकामामुळे शेतकर्‍यांच्या फळबागा, बोअर, विहीरी, घरे असुन या पाईपलाईनमुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या कडेला शासनाने सामजिक वानिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करुन रस्त्यालगत रोजगार हमी योजनेतुन दोन्ही बाजुला वृक्ष लागवड केलेली असून पाईपलाईनमुळे मोठया प्रमाणात झाडांची नुकसान होवुन पर्यावरणाची हानी होणार आहे. या वृक्ष लागवडीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च कलेला असुन तो या कंपनीच्या पाईपलाईनसाठी केलेल्या खोदकामामुळे संपूर्ण खर्च वाया जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्या स्तरावर त्या ठिकाणी योग्य ते पंचनामे होवुन सदरील शेतकर्‍यांना त्यांची होणारी नुकसान भरपाई तात्काळ मिळावी. तोपर्यंत सदरील कंपनीला काम ठेवणेबाबत तात्काळ आदेश देण्यात यावे तसेच झाडांची तोड केल्या प्रकरणी त्यांच्यावर वनविभाग मार्फत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून आणि नागरिकांमधून होत आहे.
   भारत गॅस पाईपलाईनच्या कामासाठी तोडलेल्या झाडांची व झालेल्या नुकसानीची तातडीने कंपनीने भरपाई न दिल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रसंगी शेतकरयांना बरोबर घेऊन उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले. या बाबत कालिया प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर दिपक जैन यांना फोन वरून विचारणा केली असता त्यांनी आमची देखील मोठी ओळख आहे आणि हे काम केंद्र शासनाचे असून आमचे कोणीही काहीही करू शकत नाही अशी धमकीवजा प्रतिक्रिया दिली.

No comments:

Post a Comment