रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनासाठी.. खा. विखेंचे मंत्री नितिन गडकरी यांना निमंत्रण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनासाठी.. खा. विखेंचे मंत्री नितिन गडकरी यांना निमंत्रण.

 रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनासाठी.. खा. विखेंचे मंत्री नितिन गडकरी यांना निमंत्रण.अहमदनगर -
खा.सुजय विखेंनी नगर जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. जिल्ह्यातील अनेक विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत दिल्लीत विविध मंत्र्यांना भेटत असतात. अहमदनगर-शिर्डी, अहमदनगर-करमाळा, नगर शहर बायपास सह अनेक रस्त्यांच्या कामांना केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरीं कडून त्यांनी मंजूर मिळविले आहे. खासदार विखे यांनी नवी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेवून जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासंदर्भात चर्चा केली.  यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते प्रकल्प व विविध विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. या भेटीदरम्यान त्यांच्या माध्यमातून मान्यता मिळालेल्या विविध रस्ते प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. लवकरच सुरु होणार असून या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी त्यांनी लवकरात लवकर वेळ द्यावा व ही विकासकामे मार्गी लावावीत अशी विनंती त्यांना केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here