श्री खंडेराय यात्रा साधेपणाने साजरी करण्याचा राहुरीत निर्णय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

श्री खंडेराय यात्रा साधेपणाने साजरी करण्याचा राहुरीत निर्णय

 श्री खंडेराय यात्रा साधेपणाने साजरी करण्याचा राहुरीत निर्णय

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेरायाची यात्रा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत फक्त धार्मिक विधी करीत होणार असल्याचे खंडेराया देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले . खंडेराया यात्रा समितीच्या वतीने खंडेराय ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मारुती मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी बैठक घेण्यात आली . खंडेराय यात्रा समितीच्या मागील पदाधिकान्यांची निवड कायम करण्यात आली . तसेच यावर्षी वर्गणी न करता मागील वर्षीची येणे बाकी फक्त गोळा करण्यात येणार आहे . या सर्व निधीतून खंडेराया देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या दगडी पायर्‍या व इतर सुशोभीकरणावर अंदाजे 10 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले . चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले . यावेळी अध्यक्ष रावसाहेब ( चाची ) तनपुरे , शिवाजीराव डौले , पत्रकार राजेंद्र वाडेकर , नगरसेवक सोन्याबापू जगधने , शिवाजी वराळे , विलास वराळे , सचिन तनपुरे , विजय भुजाडी , काका डावखर , राजेंद्र वराळे , संजय नांदे , सुनील भुजाडी , हरिश्चंद्रे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment