महाशिवरात्रीनिमित्त कोरोना विषाणूचा नायनाट व्हावा यासाठी सातपुते तालीम मित्रमंडळाच्यावतीने प्रार्थना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

महाशिवरात्रीनिमित्त कोरोना विषाणूचा नायनाट व्हावा यासाठी सातपुते तालीम मित्रमंडळाच्यावतीने प्रार्थना

महाशिवरात्रीनिमित्त कोरोना विषाणूचा नायनाट व्हावा यासाठी सातपुते तालीम मित्रमंडळाच्यावतीने प्रार्थना


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर  ः  सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त सातपुते तालीम मित्रमंडळाच्यावतीने कोरोना संसर्ग विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांचे पालन करून हा उत्सव संपन्न झाला. सर्व भाविकांनी लवकरात लवकर कोरोना संसर्ग विषाणूचा नायनाट व्हावा,अशी प्रार्थना यावेळी केली.नगरसेवक सुभाष लोंढे व माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती अतुल दातरंगे यांनी दिली.
   नालेगाव गाडगीळ पटांगण येथील सातपुते तालीम मित्रमंडळाच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करताना भाजप मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, अनुराधाताई देशमुख, पै. लहानू शिंदे, गणेश कुर्‍हे, पै. अतुल दातरंगे, सचिन क्षीरसागर, पै. अक्षय दातरंगे, दीपक गांधी, सर्वार्थ मुदगल, संजय कांबळे, राहुल कवडे, राजू दातरंगे, आदित्य हावरे, गौरव म्याना, प्रथमेश राजपुरे, चेतन येनगूल, शुभम घोडे, मयूर बलदोटा, साहील शेख, सोपान जाधव, संदीप शिपणकर, ओंकार मेरगू आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment