45 चे 36 कसे झाले हे कोडे आहे, जिल्हा बँक ट्रेलर होता आता नगरपरिषद पिक्चर आहे ः खा. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

45 चे 36 कसे झाले हे कोडे आहे, जिल्हा बँक ट्रेलर होता आता नगरपरिषद पिक्चर आहे ः खा. विखे

 45 चे 36 कसे झाले हे कोडे आहे, जिल्हा बँक ट्रेलर होता आता नगरपरिषद पिक्चर आहे ः खा. विखे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेड बिनविरोध काढले तर कर्जतच्या निवडणुकीत त्यांनी ( आमदार रोहीत पवार) 45 ठराव असलेले घेऊन गेले पण मतमोजणीत 36 कसे झाले हे कोडे त्यांना अजून उमजेना म्हणून जिल्हा बँक ट्रेलर आहे तर नगरपरिषदेचा पिक्चर दाखवयाचा आहे असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहीत पवार यांचे नाव न घेता लगावला.
   येथील केशर लॉन्समध्ये भाजप कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार कार्यक्रमात खा. सुजय विखे पा. बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी जगन्नाथ राळेभात, विठ्ठलराव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवक अध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, प्रा. अरूण वराट, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, सुधीर राळेभात, रवींद्र सुरवसे, बापूराव ढवळे, सलीम बागवान, विनोद बेलेकर, सोमनाथ राळेभात, अँड. प्रवीण सानप, भरत काकडे, किसनराव ढवळे, मकरंद काशीद आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना खासदार विखे पा. म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देत आहेत. जगात मोफत लस देणारा भारत हा एकमेव देश आहे. जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी  कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्रत्येकाने घरोघर जाऊन त्यांना लसीचे महत्त्व सांगून लसीकरण करण्यास कटीबध्द करा. राज्यातील जेवढे खासदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी केंद्र सरकारकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आणला आहे पण प्रसिद्धी केली नाही परंतु येथील आमदार हा निधी मीच आणला असे सोशल मिडियावर सांगत आहेत जे काम आपण केले नाही त्याचे श्रेय घेऊ नये याबाबत मी जनतेत जाऊन निधी आणल्याचे सांगणार आहे. जिल्ह्यात 50 वर्षापासून विखे घराणे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे व संघर्ष करण्यासाठी साथ देत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here