कोरोनाबाधितांसोबत सेल्फी काढीत आ. लंके यांची दुसरी इनिंग सुरू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

कोरोनाबाधितांसोबत सेल्फी काढीत आ. लंके यांची दुसरी इनिंग सुरू.

 कोरोनाबाधितांसोबत सेल्फी काढीत आ. लंके यांची दुसरी इनिंग सुरू.

ऑक्सीजनवर असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांची विचारपूस !
आ. लंके यांच्या धाडसाचे रुग्णांनाही अप्रुप !
     कोरोना बाधित रुग्णांच्या आजूबाजूला त्यांच्या घरातील सदस्यही फिरकत नसताना आ. लंके हे उपचार घेत असलेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन थेट भेट घेत दिलासा देत आहेत. नागरिकांच्या प्रेमापोटी आ. लंके यांच्याकडून केल्या जात असलेल्या या धाडसाचे रुग्णांनाही अप्रूप वाटत आहे.नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे असे सांगत गेल्या वर्षी  मार्च महिन्यापासून कोरोना रूग्ण तसेच लॉकडाऊनमुळे बाधित झालेल्या नागरीकांसाठी आहोरोत्र झटणार्‍या आमदार नीलेश लंके यांनी कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यातील आपल्या इनिंगला सुरूवात केली आहे !गेल्या महिनाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आ. लंके यांनी सुरूवातीस नागरीकांना प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर विविध शासकिय अधिकार्‍यांकडून कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेत राज्य पातळीवरून मतदारसंघासाठी काही मदत आवष्यक आहे का याचीही त्यांनी चाचपणी केली. रूग्णांच्या संख्येत वाढ होऊन सरकारी तसेच खाजगी रूग्णालयात कोरोना बाधित उपचार घेऊ लागले असून  आ. लंके यांनी सुपे येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची शुक्रवारी रात्री भेट घेतली. सामान्य रूग्णांपेक्षा अधिक त्रास होत असलेल्या, श्वसनाचा त्रास होत असलेल्या रूग्णांची आ. लंके यांनी थेट त्यांच्या बेडजवळ जाऊन भेट घेतली. रूग्णालयाचे डॉक्टर बाळासाहेब पठारे हे देखील त्यांच्या समवेत होते.
   देशभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचा नागरीकांची चांगलाच धसका घेतला आहे. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काळजी न घेणारे नागरीक कोरोनाची बाधा झाल्यानंतर मात्र देवाचा धावा करतात. माझे काय होणार ? याची चिंता करतात. अशाच रूग्णांना दिलासा देण्यासाठी आ. लंके यांनी  आजवर अनेकदा या रूग्णांची भेट घेत, त्यांच्यासमवेत सेल्फी काढीत, त्यांना एखादे फळ खाण्याचा आग्रह धरीत दिलासा देण्याचे काम त्यांनी केेले आहे. गेल्या वर्षी  राज्यातच नव्हे तर देशात पहिल्या क्रमांकाचे ठरेल अशा शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात त्यांनी हजारो रूग्णांवर मोफत यशस्वी उपचार केले. विशेष म्हणजे येथे उपचार घेतलेला एकही रूग्ण दगावला नाही ! लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीयांसाठी त्यांनी निवासाची, त्यांच्या भोजनाची तसेच परतीच्या प्रवासाचीही त्यांनी व्यवस्था केली. रणरणत्या उन्हात अनवाणी चालणारांच्या पायांच्या वेदनाही आ. लंके यांच्या हृदयाला भिडल्या. अनवाणी गावाचा रस्ता धरलेल्या हजारोंच्या पायाला चप्पल देण्याचे मोठे कामही आ. लंके यांनी केले.कोरोनाचा प्रादुर्भाव दुसर्‍यांदा वाढू लागल्यानंतर आ. लंके यांनी सुपे येथील रूग्णालयात जाऊन घेतलेली रूग्णांची भेट सर्वांनाच सुखद धक्का देउन गेली. आ. लंके यांनी त्यांच्या समवेत सेल्फी काढल्या, गप्पा टप्प्पा मारल्या. विनोद करीत ते कोरोनाववर नक्कीच मात करतील असा विश्वास व्यक्त करीत आ. लंके यांनी रूग्णांना दिलासा दिला. आ. लंके यांच्या समाजाप्रती असलेल्या प्रेमाचे कौतुक होते आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here