वीजबिले भरूनही शेतकर्‍यांना जळालेले रोहित्र स्वखर्चानेच आणावे लागतात बदलून ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

वीजबिले भरूनही शेतकर्‍यांना जळालेले रोहित्र स्वखर्चानेच आणावे लागतात बदलून !

 वीजबिले भरूनही शेतकर्‍यांना जळालेले रोहित्र स्वखर्चानेच आणावे लागतात बदलून !

बहिरोबावाडी येथील शेतकर्‍यांची महावितरण कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी !
शेतकर्‍यांकडुन वीजबिल वसुली करून हि जर शेतकर्‍यांना जळालेले रोहिञ स्वखर्चानेच दुरूस्त करून आणावे लागत असेल तर हि महावितरण कंपनीकडून शेतकर्‍यांची घोर फसवणूक होत आहे.कारण शेतकर्‍यांनी वीजबिल भरल्यानंतर त्यांना विजेच्या संदर्भात उद्भवणार्‍या सर्व समस्या सोडविणे व त्यांना नियमितपणे सेवा पुरविणे महावितरण कंपनीला कायद्याने बंधनकारक आहे.त्यामुळे महावितरण कंपनीने यापुढे आपल्या कामात सुसुत्रता आणुन शेतकर्‍यांची गैरसोय व पिळवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा कंपनी विरोधात शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.
                                                    अनिल देठे पाटील (शेतकरी नेते)


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः  पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार उपकेंद्रातंर्गत येणार्‍या बहिरोबावाडी येथील पाझर तलाव क्रमांक दोनचा ट्रान्सफार्मर पंधरा दिवसांपूर्वी जळाला असता सदर चा ट्रान्सफार्मर तातडीने महावितरण कंपनीने बदलुन द्यावा अशी शेतकर्‍यांची मागणी होती या संदर्भात शेतकर्‍यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी व कर्मचार्‍यांशी चर्चा देखील केली होती परंतु त्यांच्याकडून ट्रान्सफार्मर तातडीने बदलुन मिळणार नसल्याचे शेतकर्‍यांना सांगण्यात आले. ट्रान्सफार्मर दोन दिवसांत न मिळाल्यास पाण्याअभावी सर्व पिके जळून जातील म्हणून शेतकर्‍यांनी लोकवर्गणीतून ट्रान्सफार्मर बदलून आणण्याचा निर्णय घेतला व तो बदलुन आणला देखील माञ बदलुन आणलेला ट्रान्सफार्मर एकाच दिवसात पुन्हा जळाल्याने शेतकर्‍यांना मोठा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. आधीच महावितरण कंपनीने शेतकर्‍यांकडील थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. वीजपुरवठा सुरळीत सुरू व्हावा यासाठी शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीने निश्रि्चत केलेले  ट्रान्सफार्मर निहाय वीजबिल नुकतेच भरून वीजपुरवठा पुर्ववत झाला होता माञ त्यातच  रोहित्र जळाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला असून , पाण्याअभावी पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. यामुळे संतप्त झालेल्या पांडुरंग व्यवहारे , मारूती सावंत , बापू व्यवहारे , बाळासाहेब शिंदे , भाऊसाहेब व्यवहारे आदी शेतकर्‍यांनी महावितरणच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत यापुढे वीजबिल भरण्याच्या संदर्भात शेतकरी सकारात्मक भुमिका घेणार नाहीत असा सज्जड इशाराच त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here