पारनेरची अरविता बोरुडे राज्यात प्रथम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

पारनेरची अरविता बोरुडे राज्यात प्रथम

 पारनेरची अरविता बोरुडे राज्यात प्रथम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः नुकतेच धुळे येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय तेग सु डो कराटे स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हाला लहान गटात  प्रथम गोल्ड मेडल व प्रथम चषक पारनेर च्या कुमारी अरविता राहुल बोरुडे हिने  मिळून दिले आहे.
   राज्यस्तरावर खेळल्या गेलेल्या  या स्पर्धेत राज्यभरातून सर्व जिल्ह्यातील स्पर्धक खेळाडु सहभागी झाले होते. अरविता ही पारनेर पब्लिक स्कुल ची विद्यार्थींनी असुन इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत आहे.अरविता च्या यशामुळे पारनेर तालुक्याला,राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करायची संधी मिळणार आहे.
   अरविता हिला बांगर मॅडम व राहिंज सर यांनी मर्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल अहमदनगर जि.प.चे मा.उप.अध्यक्ष सुजित पाटील झावरे,सभापती गणेश शेळके,पंचायत समिती सदस्या सौ.सुप्रियाताई साळवे यांनी अभिनंदन
केले.

No comments:

Post a Comment