सुपा-शहाजापुर रस्त्यात मोठ मोठे खड्डे सागर मैड यांची बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

सुपा-शहाजापुर रस्त्यात मोठ मोठे खड्डे सागर मैड यांची बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी...

 सुपा-शहाजापुर रस्त्यात मोठ मोठे खड्डे सागर मैड यांची बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी...


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः तालुक्यातील सुपा येथील ग्रामस्थांचा जॉगिंग ट्रॅक आसलेला सुपा शहाजापुर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून सुपा गावचे उपसंरपच सागर मैड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन तात्काळ दुरुष्तीची मागणी केली आहे.
   पारनेर तालुक्यातील  सुपा-शहाजापुर रोडवर सकाळ संध्याकाळ शेकडो नागरिक फिरायला आसतात. यात पुरुषा बरोबर महीलाही मोठ्या संख्येने असतात. तर शालेय विद्यार्थी या रोडवर सांयकाळी उशीरा व पहाटे पळण्याचा सराव करत असतात. शहाजापुरच्या नागरिकांना कामगारांना शेतकर्‍यांना सुपा पारनेर शिरुर इकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.गेल्या वर्षे भरापासुन हा रस्ता खुपच खराब झाला आहे. इतका खराब कि या रस्ताने वहान चावलने तर दुर साधे पायी चालणे ही कठीण होऊन बसले आहे. यातच वहान चालक खड्डे चुकवण्याच्या नादात कित्येकदा पादचार्‍यांच्या अंगावर जाऊन लहान मोठे आपघात झाले आहेत. शहाजापुरच्या विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी याच मार्गाने यावे लागते रस्ता खराब झाल्याने विद्यार्थ्यांना सायकल चालवने कठीन झाले आहे तर खराब रस्तामुळे सुपे कराची सकाळ संध्याकाळ शुभ होण्याऐवजी अशुभच जास्त होते.शहाजापुरला असलेल्या पवन उर्जा प्रकल्पाची आवजड वहाने नेहमीच या रस्तावरुन जात येत आसतात. त्यांच्या वहानानेही नेहमीच रस्ता खराब झाला आहे परंतु तेही अशावेळी हात झटकून मोकळे होत आहेत. नागरिक शेतकरी विद्यार्थी कामगार यांची आडचण पाहून सुपा गावचे उपसरंपच सागर मैड यांनी सोमवार दिनांक 22 मार्च रोजी उपअभिंयता सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर यांना निवेदन देऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here