कोरोनाची दुसरी लाट थोपावण्यासाठी जागृक राहणे आवश्यक-डॉ. गिर्‍हे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

कोरोनाची दुसरी लाट थोपावण्यासाठी जागृक राहणे आवश्यक-डॉ. गिर्‍हे

 कोरोनाची दुसरी लाट थोपावण्यासाठी जागृक राहणे आवश्यक-डॉ. गिर्‍हे

उमंग फाऊंडेशनची कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उमंग फाऊंडेशनने गावोगावी जाऊन मास्क वाटप करुन कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानातंर्गत नुकतेच चांदा (ता. नेवासा) येथील ग्रामस्थांना मास्क वाटप करुन कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांसाठी मोफत सांधे विकार उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
   या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच ज्योती दीपक जावळे व उपसरपंच चांगदेव दहातोंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, गोविंद जावळे, सचिव वैशाली आडकर, सदस्य नंदकिशोर खरपुडे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ग्रामस्थांना मास्कचे वितरण करण्यात आले. डॉ. संतोष गिर्हे यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असताना ती थोपावण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी निष्काळजीपणाने न वागता कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर, योग्य आहार, व्यायामाबद्दल मार्गदर्शन करुन नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी घेण्यात आलेल्या मोफत सांधे विकार उपचार शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले.

No comments:

Post a Comment