गरजू शेतकर्‍यांनी एमआरजीएस अंतर्गत विहिरीचा लाभ घ्यावा- दीपक पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

गरजू शेतकर्‍यांनी एमआरजीएस अंतर्गत विहिरीचा लाभ घ्यावा- दीपक पवार

 गरजू शेतकर्‍यांनी एमआरजीएस अंतर्गत विहिरीचा लाभ घ्यावा- दीपक पवार

माजी सभापती दीपक पवार यांचे शेतकर्‍यांना आवाहन
  पंचायत समिती माध्यमातून गरीब गरजू घटक तसेच शेतकर्‍यांसाठी असणार्‍या अनेक योजना परिसरात राबवले आहेत विहिरी साठी पंचायत समिती माध्यमातून अनुदान उपलब्ध होत आहे पारनेर सारख्या दुष्काळी भागातील शेतकर्‍यांसाठी हे वरदान ठरणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.                              

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून सुपा येथील एमआरजीएस अंतर्गत नवीन विहिरीच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शेतकर्‍यांसह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपक पवार यांनी सांगितले की पंचायत समितीच्या माध्यमातून  सुपा परिसरामध्ये  अनेक योजना यापूर्वी राबवल्या असून  पंचायत समितीतील  घरकुल शौचालय  जनावरांसाठी गोठा  आदी योजना यापूर्वी राबवले आहेत  सध्या  नवीन विहीर  घेणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान  देण्यात येत आहे जिल्हा परिषदेकडे असणारी विहिरींची मंजुरी आता पंचायत समितीत मंजूर करण्यात येणार आहे त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी व ज्यांना विहीरींची गरज असेल अशा शेतकर्‍यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विहिरीला दोन लाख 90 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल ज्या शेतकर्‍यांना शेतामध्ये विहीर घ्यायच्या असतील त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन पवार यांनी केले आहे
यावेळी सुपा येथील योगेश रोकडे उपसरपंच सागर मैढ माजी सरपंच विजय पवार दत्ता शेठ पवार सरपंच आढाव ग्रामपंचायत सदस्य विलास पवार सुरेश नेटके वसंत पवार महादू वाढवणे संतोष रोकडे सचिन वाढवणे अरुण वाढवणे बंटी वाढवणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment