आ. निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश कब्रस्तानच्या कामासाठी 25 लाखांचा निधी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

आ. निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश कब्रस्तानच्या कामासाठी 25 लाखांचा निधी !

 आ. निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश कब्रस्तानच्या कामासाठी 25 लाखांचा निधी !


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः टाकळी ढोकेश्वर येथील मुस्लिम बांधवाच्या कब्रस्तान संरक्षण भिंत व इतर विकास कामांसाठी अल्पसंख्याक  विभागाच्या माध्यमातून लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या विशेष पाठपुराव्याने  25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे,अशी माहिती सरपंच अरुणाताई बाळासाहेब खिलारी,उपसरपंच श्री.सुनिल चव्हाण, सर्व ग्रामपंचायत व सेवा सोसायटी सदस्य टाकळी ढोकेश्वर यांच्या वतीने दिली.
        सदर कबरस्तान साठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकप्रतिनिधींकडे या संरक्षण भिंतीची मागणी करण्यात आली होती . परंतु जाणीवपूर्वक या अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते .परंतु आमदार निलेश लंके यांच्याकडे श्री. बाळासाहेब खिलारी व शिष्टमंडळांनी भेट घेतल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी तात्काळ या कबरस्तान विषयी सकारात्मक निर्णय घेत सदर संरक्षण भिंतीसाठी 25 लक्ष इतका भरीव निधी उपलब्ध करत अल्पसंख्यांक समाजाचे गेले 70 वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न सोडविल्या बद्दल टाकळी ग्रामस्थांकडून आमदार लंके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here