घटनापती युवा प्रतिष्ठानच्यावतीने चवदार तळे सत्याग्रह क्रांतिदिनी अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

घटनापती युवा प्रतिष्ठानच्यावतीने चवदार तळे सत्याग्रह क्रांतिदिनी अभिवादन

 घटनापती युवा प्रतिष्ठानच्यावतीने चवदार तळे सत्याग्रह क्रांतिदिनी अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः आज दिनांक 20 मार्च रोजी  महाड चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिनानिमित् घटनापती युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,नेवासा फाटा याठिकाणी त्रिवार अभिवादन करण्यात आले.20 मार्च 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून हा सत्याग्रह केलेला होता. याचे स्मरण म्हणून हा दिन साजरा केला जातो .या प्रसंगी घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.रवीभाऊ भालेराव,मुकिंदपूरचे पोलिस पाटील श्री.आदेश साठे,श्री.भास्करमामा लिहिणार,पत्रकार श्री राजेंद्र वाघमारे ,श्री.पंडित साहेब,श्री.बबलू साळवे,श्री.बाळासाहेब केदारे,पाष्टर हरिष चक्रानारायन,श्री.तेलतुंबडे,श्री.गणेश झगरे,श्री.विजयशेठ दहिवाळकर,श्री.फलटणकर साहेब,श्री.पप्पू इंगळे,गणपत मोरे ,विजय अंकल गायकवाड,  अविनाश खंडागळे ,दिनेश सरगैये,गजानन पवार आदी मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here