स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः येथे दि. 19 मार्च रोजी  11 ते 11:30 वाजेच्या सुमारास केलेल्या रस्ता रोको अंदोलनांमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनचे तालुकाध्यक्ष मंगेश पांडुरंग आजबेंसह सुनिल पांडुरंग लोंढे, हनुमान उगले, राहुल पवार, ऋषिकेश डूचे, नामदेव कुमटकर व इतर वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर कोरोना विषाणू चा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी काढलेल्या आदेशाचा भंग करणे.  तसेच जामखेड शहरातील व्यापारी, नोकरदार वर्ग, शेतकरी, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी इत्यादींचे नेहमीचे येण्याजाण्याचे मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बसून रस्ता अडवला व त्यांची वाहने, त्यांचे दैनिक काम व्यवसाय-व्यापार करण्यास प्रतिबंध करून त्यांची गैरसोय केली आहे. यामुळे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment