कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांची खासदार शरद पवारांशी भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांची खासदार शरद पवारांशी भेट

 कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांची खासदार शरद पवारांशी भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी नुकतीच बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार श्री. शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याबद्दल चर्चा केली. या चर्चेत त्यांनी कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या कोणत्या योजना असतील तसेच दृष्टी, आराखडा काय असेल याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेतले. तसेच केंद्र शासनाकडील कृषी विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्यासाठी श्री. शरद पवार यांनी कुलगुरू डॉ. पाटील यांना नवी दिल्लीत संबंधित केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक आयोजन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कुलगुरू डॉ. पाटील यांनी कृषी महाविद्यालय, पुणे व कृषी महाविद्यालय, धुळे येथील जमीन हस्तांतरण आणि शासनाकडून मिळालेल्या मोबदला याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे, संशोधनासाठी निधी याबाबतही खासदार श्री. शरद पवार यांचे लक्ष वेधले.
   कुलगुरू डॉ. पाटील यांनी कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार यांची भेट घेऊन बारामती कृषी महाविद्यालयाला भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांची अधिस्वीकृती मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी झालेल्या चर्चमध्ये इंक्युबेशन सेंटर स्थापनेसंबंधी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर सामंजस्य करार करून शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांमधील सहभाग वाढविण्यात येईल असे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मळद येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या 130 एकर डाळिंब शेतीला भेट देऊन कृषिभूषण अंकुश पडवळे यांचे कौतुक करुन शेतावरच त्यांचा व त्यांच्या टीमचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here