नेवासा येथे संत तुकाराम महाराज बिज उत्सव साध्या पध्दतीने साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

नेवासा येथे संत तुकाराम महाराज बिज उत्सव साध्या पध्दतीने साजरा

 नेवासा येथे संत तुकाराम महाराज बिज उत्सव साध्या पध्दतीने साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः  नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बिजेचा उत्सव मंगळवारी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.आठ दिवस साध्या पद्धतीने झालेल्या गाथा पारायण सोहळयाची सांगता ही मंगळवारी दि.30 मार्च रोजी संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने करण्यात आली.वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगदगुरू संत तुकाराम महाराजांनी परमार्थाला कलशाच्या स्थानी नेले, भगवंताच्या नामजपाचा नामघोष करत समाज उद्धारासाठी मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी बोलताना केले.
    संत तुकोबारायांनी अत्यंत कठीण परिस्थितीत धर्माचे पालन करून धर्म पाखंडांचे खंडन ही केले.अडचणीच्या काळात त्यांनी आपली संपत्ती दान केली.म्हणूनच अणू रेणू थोकडा...तुका..आकाशा एवढा..या ओवी प्रमाणे संत तुकाराम महाराजांचे कार्य हे आकाशाप्रमाणे विशाल असल्याचे उद्धव महाराजांनी सांगितले.
   संत तुकाराम महाराजांच्या बिजेच्या निमित्ताने छोटेखानी पद्धतीने झालेल्या गाथा पारायण सोहळयाचे नेतृत्व हभप उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले.तर हभप नामदेव शास्त्री महाराज जाधव,ह.भ.प. लक्ष्मण महाराज नांगरे यांनी पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सेवा दिली.अवघे वीस स्त्री व पुरुष भाविक सामाजिक अंतर राखून पारायणास बसले होते.
   आठ दिवस चाललेल्या या सोहळयाची सांगता संत महाराजांच्या बिजेला मंगळवारी दि.30 मार्च रोजी संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली.या वेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावर्षी मात्र कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर मोजकेच भाविक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here