चांदबिबी महाल परिसरात पुन्हा दिसला बिबट्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

चांदबिबी महाल परिसरात पुन्हा दिसला बिबट्या

 चांदबिबी महाल परिसरात पुन्हा दिसला बिबट्या


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः काही महिन्यांपूर्वी चांदबिबी महालाच्या परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळला होता. तेव्हापासून वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सदस्य आणि निसर्गमित्र मंदार साबळे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी बिबट्यांच्या हालचालीचा मागोवा घेत होते. दरम्यान आज मंगळवारी सकाळी रस्त्यावर नागरिकांना बिबट्या दिसून आला. नगरमधील सुनील माळवदे यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेल्याने त्यांनी तात्काळ याबाबत मंदार साबळे यांना कळवले. साबळे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना माहिती दिली. महाल परिसरात पर्यटकांना फिरण्यास काही काळ मनाई करण्यात आली होती. मात्र काही काळ इथे पुन्हा बिबट्या दिसला नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मंगळवारी सकाळी मात्र महालच्या रस्त्यावर पुन्हा काही जणांना बिबट्या दिसला. बिबट्याचा या भागात वावर असला, तरी त्याचा उपद्रव मात्र नाही. तरीही या भागात फिरायला जाणार्‍या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सुनील थेटे व मंदार साबळे यांनी केले आहे. सध्या उन्हाळ्यामुळे गवत वाळलेले असून पानगळही झालेली आहे. त्यात बिबट्याचा रंग परिसराशी खूप मिळताजुळता असल्याने झाडीत लपलेला असला तर तो चटकन नजरेस पडत नाही. त्यामुळे आडवाटेला कोणी जाऊ नये, असे साबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here