स्व. भाऊसाहेब थोरात हे कृषी व औद्योगिक विकासाचा आधारवड ः जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

स्व. भाऊसाहेब थोरात हे कृषी व औद्योगिक विकासाचा आधारवड ः जाधव

 स्व. भाऊसाहेब थोरात हे कृषी व औद्योगिक विकासाचा आधारवड ः जाधव

स्मृतिदिनानिमित्त नेवासा काँग्रेसकडून स्व. थोरात यांना अभिवादन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेले सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात हे कृषी व औद्योगिक विकासाचा आधारवड असल्याचे मत नेवासा काँग्रेसचे जेष्ठ सदस्य रमेश जाधव यांनी व्यक्त केले.यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी बोलताना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण विकासाचा पाया रचण्यासाठी कृषी व औद्योगिक विकासाची संकल्पना मांडली तिला पूर्णस्वरूप देण्यासाठी ज्यांचे योगदान लाभले आहे त्यात स्व. भाऊसाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण विकासाला चालना द्यायची असेल तर कृषी व औद्योगिक विकासाशिवाय पर्याय नाही असे विचार मांडून तो कृतीमध्ये आणण्यासाठी पुढे येऊन सहकारी साखर कारखाना, दुधसंघ, सहकारी बँका, सहकारी सोसायटी यांचे जाळे घट्ट विणून त्या अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
   याच विचारातून संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था अत्यंत मजबूत ठेवण्यात त्यांना यश मिळाले.अपंग विभागाचे नंदू कडू यांनी संपूर्ण देशात सहकार चळवळ बदनाम होत असताना त्या बदनामीचा एकही शिंतोडा आपल्या अंगावर स्व.भाऊसाहेबानी पडू दिला नाही याचे कारण म्हणजे चांगला कारभार होय.
   नेवासा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल भोगे बोलताना संगमनेर व अकोले तालुक्यातील जिरायत शेतकरी हा बागायतदार झाला पाहिजे यासाठी स्व. थोरातांनी निळवंडे धरणाची मागणी केली त्यासाठी लढा दिला , आज निळवंडे धरण पुर्ण झाले आहे त्याचे सर्वस्वी योगदान स्व. भाऊसाहेब थोरात व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याना जाते.
   कार्यक्रमावेळी तालुका सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संघटक संदीप मोटे, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, एनएसयुआईचे सौरभ कसावणे, शहराध्यक्ष रंजन जाधव, जिल्ह्या उपाध्यक्ष कार्लस साठे, जिल्ह्या सेक्रेटरी सुदामराव कदम, एससी विभागाचे नंदकुमार कडु , एससी विभाग जिल्हा कार्यध्यक्ष कमलेश गायकवाड, प्रीतम सोनवणे, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment