नागरदेवळे येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

नागरदेवळे येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

 नागरदेवळे येथे  रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः मौजे नागरदेवळे येथे जिल्हा वार्षिक योजना नागरी सुविधा विशेष अनुदान अंतर्गत खासदार डॉ. सुजय विखे व जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या सहकार्यतुन सौरभनगर रिंग रोड रस्ता डांबरीकरण  कामाचा शुभारंभ शरद झोडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
   यावेळी पंचायत समिती सदस्य सौ बेबीताई पानसरे, ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे, जगताप सर, बरबरे  सर, गणेश शेलार, विद्याताई जोशी, लक्ष्मण एडके, सौरभ ठोंबरे,भंडारी, शिंगवी आदीसह महिला व  नागरिक उपस्थित होते.
   यावेळी जि प सदस्य शरद झोडगे म्हणाले की  मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यात आल्याने नागरिक देखील समाधानी आहेत. जेथे विकासात्मक कामे होतात त्या प्रभागाचा झपाट्याने कायापालट होऊन नागरी वस्ती वाढत असते त्यामुळे आम्ही विकास कामे नागरदेवळे ग्रामपंचायतीमध्ये करत असल्याचे सांगितले तसेच सदर रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गीलावल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांचे विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment