महिला दिनानिमित्त एसएनआर महिला लघुउद्योग समुहातील यशस्वी महिलांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

महिला दिनानिमित्त एसएनआर महिला लघुउद्योग समुहातील यशस्वी महिलांचा सत्कार

 महिला दिनानिमित्त एसएनआर महिला लघुउद्योग समुहातील यशस्वी महिलांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः कुठलेच क्षेत्र असं नाही की तिथे महिलानी आपला ठसा उमटविला नाही, कर्जत तालुक्याचा विकास होत आहे यात या कंपनीचा मोठा हाथ असेल असे प्रतिपादन मिराताई शिंदे यांनी व्यक्त केले.
   जागतीक महिला दिनानिमित्त आपलं गाव आपला रोजगार अंतर्गत एस एन आर महिला लघु उद्योग समूहातील यशस्वी महिलांंचा सन्मान सोहळा आयोजित केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सौ धांडे या होत्या, राऊत हॉस्पिटल या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शहाजीनगर मधील मुक्ताई महिला भजनी मंडळातील महिलांच्या हस्ते हा महिलांंचा सन्मान करण्यात आला,  एस एन आर कंपनीच्या व्यवस्थापिका सुनीता हिरडे यांनी प्रास्ताविक करताना कंपनीची वाटचाल सांगताना नोव्हे 2020 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीत तीन महिलांंना रोजगार देऊन सध्या 342 महिलांना रोजगार दिला असून कर्जत शहरातील या कुटुंबांना आधार मिळाला आहे. कर्जतचे प्रथम नगरअध्यक्षा नामदेवराव राऊत यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या कंपनीच्या अध्यक्षा सायली नामदेव राऊत या पुण्यात कंपनीचे मार्केटिंगचे काम करतात,  कंपनीत 72 वर्षीय सौ शाहिदा झारेकरी यांनी सर्वात जास्त शिलाई काम केले अशी माहिती दिली.
   यावेळी महाराष्ट्र राज्य दक्षता समितीच्या सदस्या मीरा शिंदे, सौ भामाबाई राऊत, माजी सभापती सौ सुवर्णाताई राऊत, सौ रोहिणी ताई राऊत, डॉ अश्विनी राऊत, श्रीगोंदा येथील भारती इंगवले, ज्योती शेळके, आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या.
   नगरसेविका उषा राऊत यांनी बोलताना कर्जत शहरातील एक महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू असे म्हटले. मनीषा गदादे यांनी मुक्ताई भजनी मंडळाच्या यशाची माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य दक्षता समितीच्या सदस्या मीरा शिंदे यांनी बोलताना 342 महिलांना एकत्र ठेवण्याचे काम या कंपनीने केले आहे, महिलांच्या त्यागाचा, कामाचा सन्मान आहे, शेती असो चित्रकला असो वा इतर अनेक बाबीची निर्मिती महिलांनी केलेली आहे. सध्या पुरुष प्रधानसंस्कृतीचा महिलांवर पगडा असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here