हिवरेबाजारला शिव पाणंद शेतरस्ते, जलसंवर्धन विषयावर 5 एप्रिलला मेळावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

हिवरेबाजारला शिव पाणंद शेतरस्ते, जलसंवर्धन विषयावर 5 एप्रिलला मेळावा

 हिवरेबाजारला शिव पाणंद शेतरस्ते, जलसंवर्धन विषयावर 5 एप्रिलला मेळावा

शिवपाणंद शेतरस्त्यांसह जुन्या जलस्रोतांना पुनर्रजीवन देण्यासंदर्भात पद्मश्री पोपटरावजी पवार यांसह संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत शेतरस्त्यांसह,पाण्याच्या प्रश्नावर शेतकर्यांच्या समस्यानिवारणावर विशेष मार्गदर्शन मेळावा भविष्यासासाठी दिशादर्शक, प्रेरणादायी ठरेल..
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री,केंद्रिय वने व पर्यावरण समितिचे अशासकीय सदस्य पोपटराव पवार यांच्या समवेत शिव पाणंद शेतरस्ते नवनिर्माण व पाणीदार महाराष्ट्र कृती समितीच्या पदाधिकार्यांनी यावेळी केंद्रिय वने व पर्यावरण समितीचे अशासकीय सदस्यपदी सदस्यदी निवड झाल्याबद्दल पोपटरावजी पवारांचे अभिनंदन केले व भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी सर्वप्रथम शिवपाणंद शेतरस्ते योजना,मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेसह विहीरींच्या सातबार्यावर नोंदी करणेबाबत येणार्या समस्यांबाबत विशेष चर्चा करण्यात आली.
   यावर शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात दि.5 एप्रिल रोजी हिवरे बाजार येथे सोशल डिस्टंसह मास्कचा वापर करत शिवपांणद शेतरस्ते नवनिर्माण,जलस्रोत पुनर्जीवन   करण्यासह अनेक शेतकर्यांच्या विहीरीच्या नोंदी सातबार्यावर नोंदी न झाल्याने विजजोडीसंदर्भात येणारा प्रश्न सुटावा यासंदर्भात पोपटराव पवार,संबंधित विभागाचे अधिकारी यांसह शिवपाणंद कृती समितीच्या पदाधिकार्यांच्या उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असुन शेतकर्यांनी,नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमामध्ये सहभागी होवुन आपल्या समस्या निवारणासाठी उपस्थित रहावे असे अवाहन शिवपाणंद कृती समितीचे शरद पवळे, संजय कनिच्छे, रघुनाथ,कुलकर्णी, भास्कर शिंदे, श्रीनिवास शिंदे, अशोक आबुज, सुर्यकांत सालके, बाळासाहेब औटी, संपत जाधव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here