श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

 श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

घुले शास्त्री, धलपे, बर्वे, जाधव, दौंड, निकेत यांना उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार जाहीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रथमच या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   3100रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र व श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज लिखित योगसंग्राम ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
   काव्य, कथा, कादंबरी, चरित्र, संत साहित्य, अशा विविध साहित्य निर्मितीसाठी हे पुरस्कार दिले जातात.
संत शेख महंमद महाराज काव्य पुरस्कार कवी शरद धलपे यांच्या ’मनातील कविता’ या काव्य संग्रहास, चरित्रग्रंथ आणि वैचारिक लेखन पुरस्कार संजय बर्वे यांच्या   ’कबीर गाथा’ या साहित्यकृतीला, श्री संत शेख महंमद महाराज कथा पुरस्कार  सुनील मंगेश जाधव यांना (मन भुकेत रंगल ),
   श्री संत शेख महंमद महाराज कादंबरी पुरस्कार - ’तुडवण’साठी कैलास दौंड, यांना, संत साहित्य पुरस्कार -  संत नामदेव अभंग चिंतनिका या पुस्तिकेसाठी प्रकाश दत्तात्रय निकते यांना तर ह.भ.प. भगवान महाराज शास्त्री यांना ’साहित्यरत्न’ असे सहा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
   पुरस्कार वितरण श्री क्षेत्र वाहिरा येथे समाधी मंदिरात करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे सचिव श्री. किसन आटोळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment