अभिनव युवा प्रतिष्ठाणने उपलब्ध केला मोफत पाण्याचा टँकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

अभिनव युवा प्रतिष्ठाणने उपलब्ध केला मोफत पाण्याचा टँकर

 अभिनव युवा प्रतिष्ठाणने उपलब्ध केला मोफत पाण्याचा टँकर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

कर्जत ः
अभिनव युवा प्रतिष्ठानच्या 12व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच जागतिक वन दिन व जागतिक जल दिनाचे औचित्य साधत शहरासहित तालुक्यामध्ये चालु असलेल्या सर्व सामाजिक संघटना आणि वनविभागाच्या वृक्ष लागवडीसाठी तसेच आसपासच्या नागरिकांच्या पिण्याच्या व वापराचा पाण्यासाठी उपयोगी पडावा म्हणून कायमस्वरूपी मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे लोकार्पण करण्यात येत असल्याची माहिती अभिनव युवा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष धनंजय लाढाणे यांनी दिली आहे.

   पाणी हे जीवन आहे व ते कोठे ही कोणालाही सतत लागत असते ते सर्वाना उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक विचार डोळ्यासमोर ठेऊन अभिनव उपक्रम युवा प्रतिष्ठाण ने पुढाकार घेऊन थेट पाण्याचा टँकरच उपलब्ध करून दिला आहे. भविष्यामध्ये पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन नागरिक, वन्यजीव तसेच नवीन लागवड केलेले वृक्ष यासाठी या टँकरचा उपयोग करण्यात येणार आहे. कर्जत शहरांमध्ये चालू असलेले माझी वसुंधरा तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 या स्पर्धेसाठी उभारलेल्या स्वच्छ कर्जत अभियानासाठी या टँकरचा पुरेपूर वापर व्हावा व आपल्या शहराचा प्रथम क्रमांक यावा यासाठी अभिनव प्रतिष्ठान तर्फे याचे उपायोजना करण्यात आलेले आहे. या टँकर साठी 9960964266, 9766909936 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment