राष्ट्रवादीला कर्जत तालुक्यात जिल्हा बँकेचे दूध भाजल्याने पंचायत समितीचे ताक ही फुकुन पाहावे लागणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

राष्ट्रवादीला कर्जत तालुक्यात जिल्हा बँकेचे दूध भाजल्याने पंचायत समितीचे ताक ही फुकुन पाहावे लागणार

 राष्ट्रवादीला कर्जत तालुक्यात जिल्हा बँकेचे दूध भाजल्याने पंचायत समितीचे ताक ही फुकुन पाहावे लागणार


कर्जत :
कर्जत पंचायत समितीच्या सभापती सौ अश्विनी कानगुडे यांनी आपला कार्यकाळ संपताच राजीनामा दिल्या नंतर दि 26 मार्च रोजी नवीन सभापतीची निवड होणार असून संख्याबल पाहता राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांची वर्णी लागणे अपेक्षित आहे मात्र कर्जत तालुक्यातील राजकारणाच्या गंमती पाहता हा अनिश्चीततेचा खेळ आहे कोण जिंकेल हे कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही हेच खरे.

   कर्जत पंचायत समितीच्या सभापती सौ अश्विनी कानगुडे यांनी ठरल्या प्रमाणे सव्वा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच दिलेला शब्द पाळत आपला राजीनामा सादर केला. यानंतर जिल्हाधिकारी डॉ राजेंंद्र भोसले यांनी नूतन सभापती पदाच्या निवडी साठी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती केली असून दि 26 मार्च रोजी सभापती निवडीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
   कर्जत पंचायत समितीचे पक्षीय बलाबल पाहता सभापतीपदी मनीषा दिलीप जाधव यांची निवड होईल अशी शक्यता आहे. तसा शब्द ही कानगुडे यांच्या निवडी प्रसंगी जाधव यांना देण्यात आला होता असे प्रसिद्ध झाले होते. कर्जत पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे जाधव यांची वर्णी लागण्यास कोणतीही अडचण नाही मात्र कर्जत पंचायत समिती मधील व तालुक्यातील राजकारणातील मागील गंमती जमती पाहता यावेळी राष्ट्रवादीला व विशेष करून आ. रोहित पवार यांनाही आगामी काळात सतर्कच रहावे लागेल त्यामुळे याबाबत कोणीही ठामपणे दावा करताना दिसत नाही.
कर्जत पंचायत समितीमध्ये अपक्ष निवडून आलेल्या मात्र राष्ट्रवादी ला मानणार्‍या विद्यमान सभापती सौ. अश्विनी श्यामराव कानगुडे, तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले उपसभापती हेमंत मोरे, राजेंद्र गुंड, सौ मनीषा दिलीप जाधव, व माजी सभापती साधना अंकुश कदम असे पक्षीय बलाबल आहे. तर भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले सौ ज्योती प्रकाश शिंदे, बाबासाहेब गांगर्डे, हे अवघे दोनच सदस्य आहेत, शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले माजी उपसभापती प्रशांत बुद्धीवंत हे एकमेव सदस्य आहेत. सौ साधना कदम यांनी मधल्या काळात राष्ट्रवादीतुन भाजपात जाऊन अत्यंत शिताफीने सभापती पद मिळवले होते, तर पद मिळताच त्या पुन्हा राष्ट्रवादी च्या गोटात ही गेल्या व पुन्हा भाजपात ही आल्या,  आपल्या कार्यकाळात त्या भाजपाच्या कार्यक्रमातही दिसत होत्या, त्यामुळे त्या  भाजपाकडे जरी राहिल्या, तरी याकाळात भाजपाकडून कोणी सभापतीपदासाठी मोर्चे बांधणी करील असे पहावयास मिळत नाही, एकंदरीत पक्षीय बलाबल पाहता व राज्यात महा विकास आघाडीचे राजकारण पाहता शिवसेनेचे प्रशांत बुद्धिवंत ही राष्ट्रवादीला मदत करू शकतात. त्यामुळे सर्व बाजूने राष्ट्रवादीचा सभापती होण्यास कोणत्याही अडचणी नाहीत व ठरल्या प्रमाणे मनीषा दिलीप जाधव या सभापती होऊ शकतात. मात्र कर्जत तालुक्यातील गंमती राजकारण पाहता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जिल्हा बँकेचे दूध भाजल्याने पंचायत समितीचे ताक ही फुकुन पहावे  लागणार आहे.

No comments:

Post a Comment