अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर बेलवंडी पोलिसांची कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर बेलवंडी पोलिसांची कारवाई

 अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर बेलवंडी पोलिसांची कारवाई

37 लाख 40हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त तर आठ जणांवर गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावाच्या शिवारातील घोडनदी पात्रात बेलवंडी पोलिसांनी छापा टाकून 20 लाख रूपये किमतीचा एम एच -12 क्यू डब्ल्यू - 6333 हायवा, 40 हजार रुपयांची शासनाच्या मालकीची चार ब्रास वाळू 12 लाख रुपये किंमतीची वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट, 3 लाख रूपये किमतीची फायबर बोट, तर 2 लाख रुपये किंमतीची फायबर बोटीतून हायवामध्ये वाळू भरणयासाठी वापरलेली बोट असे एकुण 37 लाख 40हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत बापू मारुती गोरडे बाबुराव नगर, दीपक येळे रा. पारोडी तालुका शिरूर, कमलेश श्रीकांत शेंडगे राजापूर ता. श्रीगोंदा तसेच पाच ते सहा अनोळखी कामगार यांचेवर बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
    याबाबत सविस्तर असे की शुक्रवार दि.19 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली की म्हसे गावाच्या शिवारातील घोडनदी पात्रात काही इसम बोटीचे सहाय्याने नदीपात्रातील शासन मालकीची वाळू शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदा यांत्रिक बोटीचे सहाय्याने वाळू उपसा करून चोरून वाहतूक करत आहेत त्यानुसार सकाळीं 8 वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलिस नाईक ज्ञानेश्र्वर पठारे, संतोष गोमसाळे पोलिस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांनी घोड नदीपात्रात जाऊन पाहणी करत छापा मारत 20 लाख रूपये किमतीचा एम एच -12 क्यू डब्ल्यू - 6333 हायवा, 40 हजार रुपयांची शासनाच्या मालकीची चार ब्रास वाळू 12 लाख रुपये किंमतीची वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट, 3 लाख रूपये किमतीची फायबर बोट, तर 2 लाख रुपये किंमतीची फायबर बोटीतून हायवामध्ये वाळू भरणयासाठी वापरलेली बोट असे एकुण 37 लाख 40हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून बापू मारुती गोरडे बाबुराव नगर, दीपक येळे रा. पारोडी तालुका शिरूर, कमलेश श्रीकांत शेंडगे राजापूर ता. श्रीगोंदा तसेच पाच ते सहा अनोळखी कामगार यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी बापू मारुती गोरडे या हायवा चालकाला अटक करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास पो.ना पठारे डी. आर. करत आहेत.

No comments:

Post a Comment