चार वर्षांपासून फरारी अरोपींना पकडण्यात यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

चार वर्षांपासून फरारी अरोपींना पकडण्यात यश

 चार वर्षांपासून फरारी अरोपींना पकडण्यात यश.नगरी दवंडी

जामखेड - गेली चार वर्षापासून ३९५, आर्म अॅक्ट सह विविध गुन्ह्यांमध्ये फरारी असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. जामखेड पोलीस स्टेशन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज हातात घेतल्यापासूनच तालुक्यातील गुन्हेगारी व गुन्हेगार यांना आळा घालण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आज केलेल्या कारवाईस खुप महत्व प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील इतर गुन्हेगारांमध्येही खळबळ उडाली आहे.

गेली चार वर्षांपासून फरार असलेले प्रदीप राजू कांबळे, बाळू सिताराम मिसाळ व विशाल जगन्नाथ जाधव हे सोनेगाव ता. जामखेड हे सोनेगाव या त्यांच्या गावी आले असल्याची खबर गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पोलीस काॅन्स्टेबल अविनाश ढेरे, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अरूण पवार, विजय कोळी, संदीप राऊत, गणेश गाडे या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक तयार करून हे आरोप पकडण्यासाठी रवाना केले. त्यानुसार या पथकाने सापळा रचत दि. ९ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तीनही अरोपींना अटक करून पोलीस स्टेशन जामखेड येथे हजर केले.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राजेंद्र थोरात व पोलीस काॅन्स्टेबल सचिन देवढे हे करत आहेत.

  याप्रकारची कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचे पो. नि. संभाजी गायकवाड यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here