गौतम हिरण अपहरण; हत्या प्रकरणातील गूढ वाढले ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

गौतम हिरण अपहरण; हत्या प्रकरणातील गूढ वाढले !

 उद्या राज्यभर अल्पसंख्याक मोर्चा, व्यापारी, जैन समाजातर्फे निदर्शने..

गौतम हिरण अपहरण; हत्या प्रकरणातील गूढ वाढले !
दोन आरोपीस अटक पण, बेलापूर ग्रामस्थ व हिरण यांचे नातेवाईक असमाधानी !

 

हिरण याचे अपहरण झालेल्या ठिकाणास आज पोलीस महासंचालक प्रतापराव दिघावकर यांनी भेट देवुन घटनाक्रम जाणुन घेतला त्यांनी हिरण यांचे गोदाम अपहरण झालेले ठिकाण याची पहाणी केली या घटनेत असणारे साक्षीदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली ज्या ठिकाणाहुन अपहरण झाले त्या ठिकाणाचीही पहाणी केली त्यानंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना तपासाबाबत सुचना केल्या या वेळी सरपंच महेंद्र साळवी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे भरत साळुंके देविदास देसाई  प्रशांत लढ्ढा अमोल गाढे विशाल आंबेकर या वेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके या वेळी  उपस्थित होते  



नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्याप्रकरणी पोलिसांनी संशयित 2 आरोपींना गजाआड केले असले तरी हिरण यांचे नातेवाईक व बेलापूरचे ग्रामस्थ पोलिस तपासाबाबत समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचे गूढ अधिकच गडद होऊ लागले असून, या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. उद्या अखिल भारतीय जैन महासंघाने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
   भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख व अखिल भारतीय जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने करण्यात येणार असून स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे.
   ऑल इंडिया जैन सोशल फोरमतर्फेही या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. हिरण यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे अध्यक्ष अभिजित लुणिया यांनी सांगितले. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे. एक मार्च रोजी हिरण यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर सहा दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला. ते बेपत्ता असल्यापासून गावकर्‍यांनी आंदोलने केली होती. मारेकर्‍यांचा तपास लागल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिकाही ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्वत: तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यानुसार वायकर आणि गंगावणे या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर आवश्यक पुरावे आढळून आल्याने त्यांना नंतर अटक करण्यात आली. दोघेही त्याच परिसरातील असून वाळू चोरीसह अन्य गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल आहेत. मात्र, त्यांनी हिरण यांचे अपहरण आणि खून का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासातच ते पुढे येईल. यात आणखी काही आरोपी असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment