महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या ची गय केली जाणार नाही - पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या ची गय केली जाणार नाही - पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब.

 महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या ची गय केली जाणार नाही - पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब.



नगरी दवंडी

जामखेड -८ मार्च 

    समाजातील कोणत्याही महिला व मुलींना घरातील किंवा जवळच्या नात्यातील नातेवाईक, आपल्या गावात, बसस्थानक, रस्त्याने ये-जा करत असताना किंवा शाळा कॉलेजमध्ये कोणीही कसल्याही प्रकारचा त्रास देत असेल तर पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन, ०२४२१-२२१०३३ किंवा माझा मो. नं 94226 44090 या नंबरवर तक्रार करावी किंवा text message, what's app message पाठवला तरी त्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल तसेच तक्रार करणाऱ्या मुली किंवा महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले. तसेच यापुर्वीही वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालये जाऊन माझा आणि पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना देण्यात आला आहे.

 

   जामखेड महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन  मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी व  संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. फलके सर , तसेच  शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग तसेच ७० ते ८० विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.

   तसेच विद्यार्थीनींही शाळा काॅलेजमध्ये येताना बाहेरचे कोणी सोबत आणू नये. आपल्या तक्रारींवर कारवाई नक्की केली जाईल असेही पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले. यावेळी प्रिन्सिपॉल फलके व इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. 

   दरम्यान  जामखेड पोलीस स्टेशन येथेही महिला दक्षता कमिटी सदस्य, इतर प्रतिष्ठीत महिला पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अंमलदार यांची बैठक घेण्यात आली. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तसेस मिटींग दरम्यान उपस्थित सर्व महिला कमिटी सदस्य, प्रतिष्ठीत महिला,पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अंमलदार यांना छोटीसी भेट व पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले.10 महिला दक्षता समिती सदस्य व पोलीस स्टेशन येथील 3 महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment