चर्मकार विकास संघाच्यावतीने संत गुरु रविदास महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

चर्मकार विकास संघाच्यावतीने संत गुरु रविदास महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा निषेध

 चर्मकार विकास संघाच्यावतीने संत गुरु रविदास महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा निषेध


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः चर्मकार विकास संघाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पुतळ्याची पिपरा काला गावात (जि. बलिया, उत्तर प्रदेश) झालेल्या विटंबनेचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणातील समाजकंटकांना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण व जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव सुभाष चिंधे, जिल्हा अध्यक्ष संदिप डोळस, जिल्हा युवक अध्यक्ष निलेश आंबेडकर, जिल्हा सचिव अमोल डोळस, विकी कबाडे, संतोष कदम, नवनाथ बोरुडे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
पिपरा काला गावात (जि. बलिया, उत्तर प्रदेश) दि.2 मार्च रोजी संत गुरु रविदास महाराजांच्या पुतळ्याची मनुवादी समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण करुन जातीय दंगल घडविण्याचा दृष्ट हेतूने तोडफोड केली. संत गुरु रविदास महाराज यांनी सहाशे वर्षांपूर्वी बंधुभाव, समता व समानतेची शिकवण देऊन मोठे कार्य केले आहे. त्यांचे अनुयायी संपूर्ण जगात त्यांची प्रेरणा घेऊन कार्य करीत आहे. सदर पुतळ्याची विटंबना करुन मनुवादी समाजकंटकांनी रविदास महाराजांचे सर्व अनुयायी व चर्मकार समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मागील काही वर्षात दलित व महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले असून, उत्तर प्रदेश सरकार असे कृत्य करणार्या समाजकंटक आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा निषेध देखील नोंदविण्यात आला. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाजकंटकांना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment