राठोडांनी निवडणूक लढविण्यास भाजपाने पाठिंबा द्यावा- सुवेंद्र गांधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

राठोडांनी निवडणूक लढविण्यास भाजपाने पाठिंबा द्यावा- सुवेंद्र गांधी

 राठोडांनी निवडणूक लढविण्यास भाजपाने पाठिंबा द्यावा- सुवेंद्र गांधी

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवू.

प्रभाग क्र.9 पोट निवडणूक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्व.अनिल भैया राठोड यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षाने प्रभाग क्र. 9 मधून निवडणूक लढविण्याचा आदेश दिला, तर मी निवडणूक लढविल. भाजपाचे सुवेंद्र गांधी यांनी मला या निवडणुकी संदर्भात पाठिंबा व्यक्त केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे प्रतिपादन विक्रम राठोड यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांना प्रभाग क्र.9 मधून नगरसेवक होण्यासाठी पाठिंबा द्यावा. स्व. अनिल राठोड यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.
श्री राठोड याबाबत पुढे म्हणाले की, राज्यातील समीकरणे काहीही असो स्थानिक पातळीवर भाजप शिवसेना एकत्र लढल्यास दोन्ही पक्षांचा यात नक्कीच फायदा होईल. नगर शहरात भाजपा व शिवसेनेची मोठी वोट बँक आहे. स्व.अनिल राठोड व भारतीय जनता पक्षाचे संबंध चांगले असताना शहरातील राजकारणात भाजपा व शिवसेनेचा आलेख सतत उंचावला आहे. पण भाजपा व शिवसेनेची युती राज्यस्तरावरून तुटल्यामुळे तसेच दिलीप गांधी व अनिल राठोड यांचे संबंध तुटल्यामुळे स्व. राठोड यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त असूनही महापौरपदापर्यंत पोहोचता आले नाही याची खल शिवसेनेला आहे. सुवेंद्र गांधी यांनी विक्रम राठोड यांना पाठिंबा व्यक्त करून एक पाऊल पुढे टाकले आहे शिवसेनेनेही याला प्रतिसाद देण्याची गरज आहे.मनपात राष्ट्रवादी भाजपा युती होऊ शकते, तर परंपरागत मित्र असलेले शिवसेना-भाजपा स्थानिक स्तरावर राजकारणात एकत्र आले तर, असल्यामुळे या विषयावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही.
सुवेंद्र गांधी यांनी महेंद्र गंघे यांना पाठवलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, गेल्या 40 ते 50 वर्षांपासून स्व. अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले होते. त्यांचा राजकीय प्रवास खूप खडतर होता. सर्वसामन्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रभाग 9 मधील पोट निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देवू नेये अशी माझी वैय्यक्तिक मागणी आहे.
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व स्व.अनिल राठोड यांना कोणताही राजकीय वारसा नसतांना  स्वतःच्या कर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले. दोघांचा राजकीय प्रवास बरोबर सुरु झाला. दिलीप गांधी व अनिल राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणतणाव व राजकीय वाद होता तरी सुमारे 25 - 30 वर्ष दोघांनी भाजपा सेना युतीत बरोबर काम केले होते. खासदरा म्हणून निवडून येण्यात अनिल राठोड यांनी सहकार्य केले तर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी दिलीप गांधी यांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. पदांच्या माध्यमातून दोघांनी शहराच्या व जिल्ह्याच्या विकासास हातभार लावत सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. हे विसरून चालणार नाही.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्व.अनिल राठोड हे जवळचे स्नेही होते. प्रभाग 9 मध्ये होणार्‍या पोटनिवडणुकी साठी भाजपाने उमेदवार न देता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या कडेही करणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here