विशाल खैरे यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

विशाल खैरे यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती

 विशाल खैरे यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्याचे भूमीपुत्र व सध्या अंमली पदार्थ विरोधी पथक, घाटकोपर युनिट मुंबई येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले विशाल चंद्रकांत खैरे यांना नुकतीच पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.
विशाल खैरे हे राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जि.प.प्रा.शाळेत मुख्याध्यापक पदी काम करत होते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलीस स्टेशन येथे काम केले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक येथे त्यांची नेमणूक झाली. याकाळात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या टोळीचा तपास करत अनेक आरोपींना ताब्यात घेत धाडसी कारवाई केली. त्यांना आता पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाल्याने अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment