माजी भाजपा मंत्र्यांच्या मेहुण्याच्या मुलाचा बनावट दाखल्यावर शाळेत प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

माजी भाजपा मंत्र्यांच्या मेहुण्याच्या मुलाचा बनावट दाखल्यावर शाळेत प्रवेश

 माजी भाजपा मंत्र्यांच्या मेहुण्याच्या मुलाचा बनावट दाखल्यावर शाळेत प्रवेश

मनसेचे जिल्हा सचिवांची शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील माजी भाजपा मंत्र्याच्या मेहुण्याच्या मुलाने  बनावट उत्पन्नाचा दाखला बनवून 2016-2017 या काळात नगर मधील ‘तक्षशिला हायस्कूल’ मध्ये मोफत प्रवेश घेतला असून त्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात भुतारे म्हटले आहे की, सन 2016-2017 अंतर्गत ठढए कायद्यानुसार या शैक्षणिक वर्षात जिल्हयातील भाजपचे माजी मंत्री यांच्या मेव्हण्याने आपल्या मुलाचा प्रवेश तक्षासिला स्कुल अहमदनगर येथे मोफत घेतला आहे. आर टी ई कायदा नुसार खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत 25% वंचित घटक तसेच आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न एक लाखा पेक्षा कमी आहे याच पाल्याला आर टी ई कायद्यानुसार प्रवेश देता येतो. पाल्याच्या वडिलांनी बोगस ,बनावट उत्पन्नाचा दाखला बनून सन 2016-2017 या वर्षात आपल्या पाल्याचे तक्षशिला स्कूल मध्ये प्रवेश घेतला.
भाजपाचे माजी मंत्री यांचे मेहुण्याकडे लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न असुन मेव्हण्याची बायको या बीड जिल्हयातील आष्टी तालुक्यातील पंचायत समिती मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी आहे. या संबंधीचे सर्व पुरावे हे शिक्षण मंत्री यांना पाठविले आहेत. गोरगरीब, वंचित घटक, व आर्थिक दुर्बल       घटकातील मुलांच्या आरक्षणावर सुध्दा डल्ला मारण्याचे काम असे लोक करत असतील तर या मंत्र्यांना आरक्षण मागुन तरी काय उपयोग या सर्व प्रकरणाचा खुलासा भारतीय जनता पार्टीने करावा
अहमदनगर जिल्हयातील आर टी ई अंतर्गत झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रवेशांची चौकशी करावी तसेच या व्यक्तीला चुकीचा बनावट उत्पन्नाचा दाखला करुन देणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर सुध्दा कारवाई करावी त्यामूळे असे शासनाची फसवणुक केल्याची अनेक प्रकरणे बाहेर येतील. अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here