48 तासात 2167 रुग्ण आज 829 कोरणा पॉझिटिव्ह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

48 तासात 2167 रुग्ण आज 829 कोरणा पॉझिटिव्ह

 48 तासात 2167 रुग्ण आज 829 कोरणा पॉझिटिव्ह

कोरोनाचा आलेख रोजच वाढतोय.

अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला तयार नाही. काल 1336 रुग्ण आढळल्यानंतर येत्या 24 तासात 829 नवीन रुग्णांची भर पडली असून 48 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नगर शहरात कोरोनाचा आलेख कायम असल्याचे दिसून येत आहे. आज मनपा हद्दीत नवीन 239 रूग्णांची भर पडली आहे.  त्याखालोखाल कोपरगाव 89 आणि राहाता तालुक्यात 81 रूग्ण आढळून आले आहेत. नगर ग्रामीणमध्येही रूग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असून चोवीस तासात 74 बाधितांची भर पडली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आरटीपीसीआर तपासणीत 205, खासगी लॅबमधील तपासणी 404 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 220 बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे नगर मनपा - 239, कोपरगाव -89, राहाता-81, नगर ग्रामीण-74, श्रीरामपूर-55, नेवासा-52, पारनेर-48, संगमनेर-97, कर्जत-32, राहुरी-30,अशी आहे.

No comments:

Post a Comment